कोल्हापूर

कंदलगाव.प्राध्यापक,विद्यार्थ्यांच्या योगादानामुळे राष्ट्रीय पुरस्कारांना गवसणी.डॉ.वनरोट्टी :

CD

08864

प्राध्यापक, विद्यार्थ्यांच्या
योगदानामुळे राष्ट्रीय पुरस्कार

डॉ. वनरोट्टी : केआयटी ‘बेस्ट परफॉर्मिंग इन्स्टिट्यूट’

कंदलगाव, ता. ५ : ‘‘स्टार्टअप्स, दर्जेदार उद्योग समूहातून विद्यार्थ्यांना मिळत असलेली इंटर्नशिपची संधी, विविध उद्योग समूहांच्या सोबत केआयटी चे झालेले शैक्षणिक करार यामुळेच केआयटीचे यावर्षी प्रवेश पूर्ण झाले आहेत.या सर्व स्तरावरील प्राध्यापक,विद्यार्थ्यांच्या यशस्वी योगादानामुळे राष्ट्रीय पुरस्कारांना गवसणी घालणे शक्य झाले,’’ असे मत संचालक डॉ. मोहन वनरोट्टी यांनी व्यक्त केले.
केआयटी अभियांत्रिकी (स्वायत्त) महाविद्यालयाला ‘एज्युस्कील’ यांनी ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन यांच्याशी संयुक्तपणे आयोजित केलेल्या ‘एज्युस्कील कनेक्ट-२४’ नेक्स्ट जनरेशन स्किल’ आणि ‘एच.आर.समिट २४’मध्ये बेस्ट परफॉर्मिंग संस्था-२४ या सह अन्य राष्ट्रीय स्तरावरील पाच पुरस्कारांनी सन्मानित केले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रम २७, २८ सप्टेंबरला डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल सेंटरमध्ये झाला. प्रशिक्षणाच्या माध्यमातून ५० हून अधिक विद्यार्थ्यांना बेस्ट परफॉर्मिंग इन्स्टिट्यूट पुरस्कारासोबत डिरेक्टर एक्सलन्स ॲवॉर्ड, बेस्ट परफॉर्मिंग सेंटर ऑफ एक्सलन्स सीओई को-ऑर्डिनेटर डॉ. ममता कळस, राष्ट्रीय स्तरावरील रँक ४६, वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड, टॅलेंट कनेक्टेड पुरस्कार डॉ. अमित सरकार या अन्य ५ पुरस्कारांनी कॉलेजला सन्मानित केले. ‘एआयसीटीई’चे अध्यक्ष टी. जी. सीतारामन, ‘एआयसीटीई’ सदस्य सचिव राजीवकुमार, प्रा. के. के. अग्रवाल, एज्युस्कीलचे संस्थापक अध्यक्ष सुभाजित जगदेव यांच्या उपस्थितीत पुरस्कार प्रदान झाले. संस्थाध्यक्ष साजिद हुदली, उपाध्यक्ष सचिन मेनन, सचिव दीपक चौगुले व अन्य विश्वस्तांच्या सततच्या प्रोत्साहनामुळे, मार्गदर्शनामुळे यश मिळत आहे. डॉ. ममता कळस यांनी ‘एज्युस्कील’अंतर्गत विविध परीक्षांचे समन्वयक म्हणून काम पाहिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat: शिर्डीच्या प्राईम भूखंडावर घाईघाईने गव्हाची कापणी! कॅप्टन खरातच्या अफाट संपत्तीचे धक्कादायक रहस्य उघड... कुठे किती संपत्ती?

Nashik Temple Theft : देवही सुरक्षित नाहीत! सातपूरमधील ३ मंदिरांच्या दानपेट्या फोडणारा चोरटा गजाआड

PNG Gas Connection : गॅस सिलिंडरचं टेन्शन मिटलं ! आता २४ तासांत मिळेल PNG कनेक्शन, घरबसल्या 'असा' करा अर्ज

RCB चा माजी खेळाडू झाला पुन्हा बाबा; दोन जुळ्या मुलानंतर घरी आली परी

Hindu Nav Varsh: असा मराठी राजा, ज्याचा विजय साजरा करण्यासाठी गुढी उभारण्याच्या प्रथेला झाली सुरुवात; जाणून घ्या इतिहास

SCROLL FOR NEXT