8979
विद्या चव्हाण
...........
विद्या चव्हाण यांना
मलेशियात कांस्यपदक
कंदलगाव, ता. २२ : मलेशिया येथे नुकत्याच झालेल्या इंटरनॅशनल ॲथलेटिक ओपन मास्टर स्पर्धेत आर. के. नगर येथील ५५ वर्षीय विद्या चव्हाण यांना ब्राँझपदक मिळाले. त्यांना कोल्हापूर मास्टर्स ॲथलेटिक असोसिएशन आणि कोल्हापूर वॉकर्स ग्रुपचे सहकार्य लाभले. प्रशिक्षक आशिष रावळू आणि आर्यन मॅन पंकज रावळू यांचे मार्गदर्शन लाभले. यापूर्वीही त्यांनी मुंबई नॅशनल ओपन मास्टरमध्ये सुवर्ण, रौप्य व दोन ब्राँझपदके पटकावली आहेत. त्या देशांतर्गत अनेक स्पर्धा खेळल्या आहेत. आंतरराष्ट्रीय स्पर्धेचा हा पहिलाच अनुभव होता. स्पर्धेत १७ देशांतील स्पर्धक सहभागी झाले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.