10815
कचरा टाकणाऱ्यांवर कॅमेऱ्यातून नजर
पाचगाव ग्रामपंचायतीचा प्रकल्प; दहा ठिकाणी सीसीटीव्ही
कंदलगाव, ता. ११ : वाढती लोकसंख्या आणि कॉलन्यांचा वाढता विस्तार यामुळे अनेकदा कचरा उठावाचे नियोजन, जनजागृती करूनही मोठ्या प्रमाणावर ठिकठिकाणी रस्त्यावर कचरा साचत आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य बिघडत आहे. रस्त्यावर कचरा टाकणाऱ्यांना आळा बसावा यासाठी पाचगाव ग्रामपंचायतीच्या माध्यमातून १ लाख ७ हजारांचा खर्च करून गावच्या हद्दीमध्ये दहा ठिकाणी सीसीटीव्ही बसवून कचरा टाकणाऱ्यांवर नजर ठेवून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.
पाचगाव ग्रामपंचायती कडून सात घंटागाडी व तीस कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून कचरा उठाव होत असूनही काही भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर कचऱ्याचे ढीग साचत आहेत.अशा ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईसाठी हे सीसीटीव्ही बसविले आहेत.
_____
सीसीटीव्ही लावलेली ठिकाणे
गिरगांव रोड कॉर्नर
ओंकारनगर अमृतनगर मेन रोड
शिवतेज कॉलनी डवरी गोडावूनजवळ अमृतनगर
शांतीनगर रोड, मनोज जांभळे यांच्या घराजवळ
महालक्ष्मी पार्क, मेतके यांच्या घराजवळ
स्मशानभूमी परिसर
माणिक ट्रेडर्सजवळ आर.के.नगर मेन रोड
भारती विद्यापीठजवळ
निगडे पार्क रोडनजीक पाचगाव-कंदलगांव रोड
गोदावरी अपार्टमेंट पुलाजवळ
_____
कोट
10814
दोन वर्षांपासून एक दिवस आड परिसरात घंटागाडी फिरत आहे. तरीही काही नागरिक रस्त्यावर कचरा टाकतात. त्यामुळे इतर लोकांचे आरोग्य बिघडत आहे. कचरा टाकणाऱ्यांना आळा बसावा; यासाठी हे सीसीटीव्ही बसवले आहेत. सीसीटीव्हीच्या माध्यमातून कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाईल.
- प्रियंका पाटील, सरपंच
10813
पाचगाव ग्रामपंचायतीने अतिशय चांगला उपक्रम राबवला आहे. यामुळे परिसरात कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई तर होईलच; त्याचबरोबर इतरत्र कचराही पडणार नाही. नागरिकांचे आरोग्य चांगले राहील.
- जीवन देवडकर, बांधकाम व्यवसायिक, आर. के. नगर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.