कोल्हापूर

खोचीमध्ये भैरवनाथांचा सरता रविवार

CD

खोचीमध्ये भैरवनाथांचा सरता रविवार
खोची, ता.४ ः येथील ग्रामदैवत श्री भैरवनाथ मंदिरात सरता रविवार साजरा केला. यानिमित्त विविध पारंपरिक व धार्मिक विधी सेवा झाल्या.
कार्यक्रमाचे आयोजन श्रींचे सालकरी पुजारी धनाजी गुरव, गुरदेव गुरव यांनी केले. रात्री साडेनऊ वाजता श्रींचा पालखी सोहळा मंदिर परिसरात गुलालाच्या उधळीत न्हाऊन गेला. भक्तांगणाडून केलेल्या नयनरम्य आतषबाजीने चैत्रबन उजळून निघाला.
येथील भैरवनाथांच्या मंदिरात मृग नक्षत्रापूर्वी येणाऱ्या रविवार दिवस सरता रविवार म्हणून परंपरेने साजरा केला जातो. या रविवारपासून श्रींचा पालखी सोहळा नवरात्रोत्सवातील खंडेनवमीपर्यंत स्थगित केला जाणार आहे.पहाटे श्रीं भैरवनाथांच्या विधीवत पुजा बांधण्यात आली. आरतीनंतर श्रींचे दर्शन भाविकांसाठी खुले करण्यात आले.यानंतर दिवसभर दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.यावेळी भक्तगणांना महाप्रसादाचे वाटप केले.
रात्रौ साडेनऊ वाजता पालखी सोहळ्यास प्रारंभ करण्यात आला. यावेळी पालखीसमोर अश्व,अब्दागिरी,छत्र,सेवेकरी,मानकरी सुर्यवंशी, शिंदे,मगदूम,जाधव,बाबर,यशवंत समाज,चर्मकार, नाभिक समाज व पुजारी,गुरव,गोसावी,व डवरी असा लवाजमा सेवेत कार्यरत होते.यावेळी पालखी सोहळा मंदिर परिसरात काढून पुन्हा राजसदरेवर विसावला. तत्पूर्वी पालखी वर गुलाल खोबऱ्याची मुक्त हस्ते उधळण करण्यात आली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

IPL 2024: RCB चा आनंद गगनात मावेना! प्लेऑफमध्ये पोहचताच केला जोरदार जल्लोष, पाहा Video

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

SCROLL FOR NEXT