कोल्हापूर

पोषण आहार भरारी पथके कागदावरच : ना भेट ना अहवाल.

CD

पोषण आहार भरारी पथके कागदावरच

पथकांकडून ना शाळांना भेटी, ना शिक्षण विभागाकडे अहवाल सादर


कोनवडे, ता. २१: शाळेतील विद्यार्थ्यांना आहार वाटप कमी करणे, निकृष्ट आहार देणे, आहार वाटपच न करणे आदी तक्रारी आल्यानंतर शासनाने पोषण आहार योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी भरारी व दक्षता पथकाची १ जून २००९ रोजी नियुक्ती केली. परंतु या पथकांनी ना शाळांना भेटी दिल्या, ना शिक्षण विभागाकडे अहवाल सादर केला. त्यामुळे जिल्ह्यातील शालेय पोषण आहार योजनेसाठी नेमण्यात आलेल्या भरारी व दक्षता पथकांची निवड कागदावरच राहिली आहे.
मुलांना शाळेत देण्यात येणाऱ्या पोषण आहाराची अंमलबजावणी व्यवस्थित व्हावी, यासाठी जिल्हास्तरावरून भरारी पथकांची नेमणूक करण्यात आली होती. यामध्ये पंचायत समिती गट शिक्षणाधिकारी, प्रशासन अधिकारी, शिक्षणाधिकारी, लेखाधिकारी तसेच शिक्षण विभागातील दोन कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र, ही निवड फक्त कागदावरच दिसत आहे.
जिल्ह्यात शालेय पोषण आहार भरारी पथकांसाठी वर्षातून दोन वेळा विविध अधिकाऱ्यांची निवड करण्यात येते. दर सहा महिन्यांनी भरारी पथकांची ऑर्डर काढून विविध अधिकाऱ्यांची नियुक्ती विविध तालुक्यात करण्यात येते. मात्र, गेल्या एक वर्षापासून भरारी पथकांनी जिल्ह्यातील किती शाळांना भेटी दिल्या, याचा अहवालच शिक्षण विभागाकडे पाठविला नाही. त्यामुळे शालेय पोषण आहार योजनेच्या दर्जाबाबत साशंकता व्यक्त होत आहे. भरारी व दक्षता पथकेच कागदावर राहिली तर मुलांना सकस आहार मिळणार कसा ? अशी विचारणा होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs SRH Live : सनरायझर्स हैदराबादचा इडन गार्डनवर दरारा! कोलकाता नाइट रायडर्सचा सलग दुसरा पराभव; गुणतालिकेत फेरबदल

Bharat Solanke : ‘स्टेअरिंग’ सोडलं अन् हातात घेतली लेखणी; ट्रकचालक भारत सोळंके यांचा ‘पीएचडी’पर्यंतचा थक्क प्रवास

IAS transfer: राज्यातील २५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; रात्री उशिरा काढले आदेश

हनुमान जन्मोत्सवानिमित्त वानरांची शिस्तीत पंगत; वानरांना एका रांगेत बसवून केले अन्नदान

Pune CNG Price Hike: मोठी बातमी! पुण्यात 'सीएनजी'चे दर वाढले; मध्यरात्रीपासून नवा भाव लागू होणार

SCROLL FOR NEXT