कोल्हापूर

ऊस पिकाला ''घोळी''चा विळखा ऊस उत्पादक चिंतेत : पिकाच्या वाढीवर गंभीर परिणाम.

CD

05515

ऊस पिकाला ''घोळी''चा विळखा
भुदरगड तालुका ः पिकाच्या वाढीवर गंभीर परिणाम

अरविंद सुतार : सकाळ वृत्तसेवा

कोनवडे, ता. २ : ऊस पिकाला घोळी नावाच्या तणाचा फटका बसत असून उसाच्या वाढीवर त्याचा गंभीर परिणाम होत आहे. शेतीच्या बांधांवर व रस्त्यावर शेतकऱ्यांनी काढून टाकलेल्या या तणाचे ढीग दिसत असून भुदरगड तालुक्यातील कूर, मिणचे, हेदवडेसह परिसरात निम्म्याहून अधिक क्षेत्रांत या तणाचा प्रादुर्भाव झाला आहे.
भुदरगड तालुक्यात ऊस व भात पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. तालुक्यात सुमारे ७३०० हेक्टरहून अधिक ऊस पिकाचे क्षेत्र आहे. ऊस हातात रोकड उपलब्ध करून देणारे पीक आणि कमी कष्टात उत्पादनाची हमी असल्याने दिवसेंदिवस या पिकाच्या लागवडीत सातत्याने वाढच होत आहे. त्यातच वेदगंगा, फये प्रकल्प, दूधगंगा कालव्याचे पाणी उपलब्ध झाल्याने या प्रकल्पांमुळे बारमाही पाणी उपलब्ध झाले आहे. एकीकडे चित्र असताना पिकात शेतकरी तोट्यात आला आहे. निम्मा खर्च ऊस भांगलन करण्यात जात आहे. वर्षभरात मावा, तांबेरा या रोगांच्या प्रादुर्भावाबरोबरच आता घोळी, मालवीय, खांडेकोळी नावाच्या तणाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढू लागला आहे. विशेषतः फेब्रुवारी, मार्च, एप्रिल महिन्यात या तणाची वाढ झपाट्याने होताना दिसते, जमिनीला चिकटूनच ती पसरते. त्यामुळे मुळासकट काढून टाकणे शेतकऱ्यांना अशक्य बनते. काढून टाकलेली एक जरी कांडी राहिली आणि ती पूर्ण सुकलेली असेल, तरीही ऊस शेतात वाढलेले ''घोळी'' तण. ती शेतात पाणी दिल्यावर झपाट्याने वाढते. विशेषतः लागण आणि तोड झालेल्या उसाच्या वाढीसाठी हाच काळ पोषक असल्याने नेमक्या याच कालावधीत ही वनस्पती फोफावत आहे. उसाच्या वाढीसाठी त्रासदायक असली तरी अनेक शेतकरी भाजी म्हणून तिचा वापर करतात शेतकऱ्याच्या तब्येतीला पोषक असणारी ''घोळी'' उसाचे व बळीराजाचे आर्थिक गणित मात्र बिघडवू लागली आहे हे निश्चित.
---
कोट :
मशागतीवर होणारा खर्च, वीज बिल आणि मिळणारा दर यांचे गणित पूर्णतः कोलमडले आहे. त्यातच ऊस पिकाच्या वाढीच्या नेमक्या कालावधीतच घोळी व अन्य तणाची उगवण होत असून पिकाच्या वाढीवर मोठा परिणाम होत आहे.
- नंदिनी लोकरे, कोनवडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तुकाराम मुंढेंचे आदेश मनमानी करणारे अन् एकतर्फी, FDA कारवाईविरोधात हायकोर्टात याचिका दाखल

Gold Rate Today: 2 दिवसांच्या तुफान वाढीनंतर सोनं घसरलं! महाराष्ट्रात आज 24, 22 आणि 18 कॅरेटचा भाव किती?

Latest Marathi Live Update: राष्ट्रीय कामाच्या नावाखाली शिक्षकांवर वाढता ताण; विद्यार्थ्यांच्या शिक्षणावरही परिणाम

Buddha Vihar Fund Controversy : थिबाराजाकालीन बुद्धविहारासाठी मंजूर झालेल्या कोट्यवधींच्या निधीवरून पेटला वाद; थेट पोलिस अधीक्षकांकडे तक्रार, नेमकं काय आहे प्रकरण?

Koyna Dam Water Storage Latest Update : कोयना धरणाची पाणीपातळी झपाट्याने वाढली! येत्या काही दिवसांत विसर्ग? महाबळेश्वरसह नवजात धुवांधार पाऊस, पाहा आजचा पाणीसाठा

SCROLL FOR NEXT