कोल्हापूर

जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू : आबिटकर

CD

09841
गारगोटी : येथे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांना निवेदन देताना मुख्याध्यापक संघाचे सदस्य.

जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी
सर्वतोपरी प्रयत्न करू : आबिटकर
गारगोटी, ता. १९ : १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त झालेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी शासनस्तरावर सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील, अशी ग्वाही पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली. महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघाचे समन्वयक बाबा पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने पालकमंत्री व शिक्षकेतर कर्मचारी एकत्र येऊन प्रकाश आबिटकर यांच्या निवासस्थानी भेट घेऊन शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या जुनी पेन्शनच्या मागणीसंदर्भात निवेदन दिले.
मुख्याध्यापक संघाचे सहसचिव बाबा पाटील म्हणाले, ‘कर्मचाऱ्यांचा जुनी पेन्शनचा प्रश्न शासनाने तातडीने मार्गी लावावा. जुनी पेन्शनच्या मागणीसाठी संघटनेतर्फे आंदोलनाची तयारी सुरू असून, २८ सप्टेंबरला मुंबईतील आझाद मैदानावर २६ हजार शिक्षक आंदोलन करणार आहेत.’ पालकमंत्री आबिटकर यांनी या प्रश्नावर शासनस्तरावर पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.
शिष्टमंडळात मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष प्राचार्य मिलिंद पांगिरेकर, श्रीकांत पाटील, पोपट पाटील, नामदेव खापरे, प्रकाश सांडुगडे, बबन इंदुलकर, विजय देसाई, युवराज नाईक, महेश पोवार, शशिकांत कासार, पी. डी. कांबळे, ए. एम. पाटील, बाबूराव राजिगरे, दत्ता पाटील, ए. बी. कदम, एल. आर. मोहिते उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident: ससूनमधून परतले, जेवणासाठी महामार्गावर उतरले; काही क्षणांतच सहाय्यक फौजदारावर काळाचा घाला, अज्ञात वाहनाची धडक अन्..

Latest Marathi News Update : शिरपूर तालुक्यात बिबट्याची दहशत; झोपडीत झोपलेल्या महिलेवर हल्ला

मामा-भाच्यात असं काय घडलं? राजगुरूनगरमध्ये धक्कादायक घटना |

Rohit Sharma: वडापाव नाही, तर टेन्शनच्या वेळी आईच्या हातचा 'हा' पदार्थ आहे कम्फर्ट फूड; रोहितने केला खुलासा

Satara Accident News: ४६ दिवस मृत्यूशी झुंज; बंगळूर महामार्गावरील अपघातात गंभीर जखमी प्रतीक काळभोरचा अखेर मृत्यू, एकुलता एक मुलगा गमावला

SCROLL FOR NEXT