कोल्हापूर

गडहिंग्लज परिसरातील संक्षिप्त

CD

73971
गडहिंग्लज : शिवराज महाविद्यालयात झालेल्या कार्यक्रमात बोलताना डॉ. अनिल कुराडे. व्यासपीठावर डॉ. राहुल जाधव, प्रा. एम. के. नोरेंज आदी.

शिवराजमध्ये स्वागत समारंभ
गडहिंग्लज : येथील शिवराज कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये औषधनिर्माण शास्त्र विभागाच्या पहिल्या वर्षाच्या विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. शिवराज विद्या संकुलाचे सचिव डॉ. अनिल कुराडे यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. कुराडे म्हणाले, ‘‘औषधनिर्माण शास्त्र हे इतर शाखांपेक्षा वेगळे आहे. सध्या या क्षेत्रात करिअरच्या मोठ्या संधी उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घ्यावा.’’ प्रा. एम. के. नोरेंज यांनी मार्गदर्शन केले. प्राचार्य डॉ. राहूल जाधव यांनी अभ्यासक्रमाची माहिती दिली. प्रा. अनघा पाटील यांनी प्रास्ताविक केले. प्रा. प्रणव सावेकर, प्रा. आरती केरुरे आदी उपस्थित होते. प्रा. ऋतुजा सावेकर यांनी आभार मानले.
-------------
73972
कृष्णा माने

कृष्णा मानेची निवड
गडहिंग्लज : येथील डॉ. घाळी महाविद्यालयाची विद्यार्थिनी कृष्णा माने हिची महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक स्पर्धेसाठी कोल्हापूर महिला हॉकी संघात निवड झाली. पुणे येथे ही स्पर्धा होणार आहे. तिला संस्थेच्या अध्यक्षा रत्नमाला घाळी, कार्याध्यक्ष सतीश घाळी यांचे प्रोत्साहन तर प्राचार्य डॉ. मंगलकुमार पाटील, क्रीडा विभाग प्रमुख प्रा. विकास अतिग्रे, मनोहर मांगले यांचे मार्गदर्शन मिळाले.
--------------
क्रिएटीव्हमध्ये आजी-आजोबांचा स्नेहमेळावा
गडहिंग्लज : येथील क्रिएटीव्ह हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांच्या आजी-आजोबांचा स्नेहमेळावा झाला. संस्थेचे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर देसाई, सचिव आण्णासाहेब बेळगुद्री यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. देसाई यांनी आरोग्य विषयक माहिती सांगितले. काही व्यायाम प्रकारांचीही माहिती दिली. बेळगुद्री यांनी जुनी-नवी कुटुंब व्यवस्था व नातेसंबंधावर मार्गदर्शन केले. आजी-आजोबांसाठी संगीत खुर्ची, अंताक्षरी, उखाणे स्पर्धा झाली. तसेच फनी गेम्सचेही आयोजन केले होते. डॉ. सुषमा देसाई, सविता बेळगुद्री, मुख्याध्यापक दिनकर रायकर यांच्यासह शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. जोतिबा पाटील यांनी स्वागत केले. सुनीता रावण यांनी सूत्रसंचालन केले. प्रियांका पोवार यांनी आभार मानले.
-----------------
होप फाउंडेशनतर्फे शिक्षिकांचा सत्कार
गडहिंग्लज : येथील होप फाउंडेशन व नगरपरिषदेतर्फे पालिका शिक्षण मंडळात कार्यरत असणाऱ्या शिक्षिकांचा सत्कार करण्यात आला. पालिकेच्या शाहू सभागृहात हा कार्यक्रम झाला. मुख्याधिकारी स्वरुप खारगे यांनी विविध विषयावर संवाद साधला. सुवर्णा पोवार, वैशाली पाटील, शोभा शिंत्रे, वालीकर, मिनाक्षी पाटील, क्रांती खोराटे, बारदेस्कर, मंगल कुंभार, दळवी, शीतल पाटील, सुजाता कांबळे, वंदना पाटील, गीता कांबळे, मिनाक्षी शिरगावे यांच्यासह शिक्षिकांचा सत्कार झाला. अवंती पाटील, रवीनंदन जाधव, नचिकेत भद्रापूर आदी उपस्थित होते.
-----------------
ओंकारमध्ये प्रमाणपत्र वितरण
गडहिंग्लज : येथील ओंकार महाविद्यालयात करिअर अभ्यासक्रमाच्या प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. इतिहास, अर्थशास्त्र, गृहशास्त्र, मराठी व इंग्रजी विभागातर्फे हे अभ्यासक्रम घेतले होते. संस्थेचे अध्यक्ष राजन पेडणेकर व प्रा. सुभाष लाखे यांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वितरण झाले. प्रभारी प्राचार्य डॉ. सुरेश चव्हाण अध्यक्षस्थानी होते. प्रा. लाखे यांनी बदलते शैक्षणिक धोरण, त्यापुढील आव्हाने व कौशल्याधारित प्रशिक्षणाची गरज या विषयावर मार्गदर्शन केले. डॉ. अनिल पाटील यांनी स्वागत केले. डॉ. काशिनाथ तनंगे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. शर्मिला घाटगे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. गंगासागर चोले यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Archery World Cup : तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत भारतीयांचा डंका! पुरुष आणि महिला कंपाऊंड संघांनी पटकावली सुवर्णपदके

Latest Marathi News Live Update: पंतप्रधान मोदींची पुण्यात सभा; पोलीस ॲक्शन मोडवर

Tesla Layoffs: इलॉन मस्कच्या कंपनीत चाललंय काय? आणखी काही कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता

Baba Ramdev: पतंजली समूह नवीन कंपनी खरेदी करण्याच्या तयारीत; काय आहे बाबा रामदेव यांचा प्लॅन?

Raw Mango: उन्हाळ्यात कैरीचा थंडगार कचुंदा घरीच नक्की करा ट्राय, जाणून घ्या रेसिपी

SCROLL FOR NEXT