कोल्हापूर

यादी पे यादी, पण पैसे कधी?

CD

यादी पे यादी; पण पैसे कधी?
शेतकऱ्यांचा सवाल : दुसऱ्या यादीतील प्रोत्साहन रकमेची प्रतीक्षाच
अवधूत पाटील : सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. १२ : मुळात शेतकरी कर्जमुक्ती प्रोत्साहन योजनेच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीस दोन वर्षे लागली. त्यात आता शासनाकडून यादी पे यादीचा सिलसिला सुरू आहे.
पहिली यादी प्रसिद्ध झाल्यानंतर शेतकऱ्यांना अडीच महिने दुसऱ्या यादीकडे डोळे लावून बसावे लागले होते. आता दुसरी यादी जाहीर करून वीस दिवसांचा कालावधी उलटला. मात्र, अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रोत्साहन अनुदानाची रक्कम जमा झालेली नाही. रक्कम कधी मिळणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
आर्थिक अडचणीतील शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी राज्य शासनाने महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना राबवली. या अंतर्गत थकबाकीदार शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले. मात्र, नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. त्यामुळे या प्रामाणिक शेतकऱ्यांसाठी ५० हजार रुपये प्रोत्साहन रक्कम देण्याची घोषणा केली. मात्र, त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यास दोन वर्षे लागली.
नव्या सरकारने सत्तेवर येताच तत्परता दाखवली. पण, प्रामाणिक शेतकऱ्यांना लाभ देतानाही टप्पे पाडले. ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात शासनाने पहिली यादी प्रसिद्ध केली. त्यावेळी पंधरा दिवसांत दुसरी यादी प्रसिद्ध करण्याचे जाहीर केले होते. मात्र, त्यासाठी अडीच महिने शेतकऱ्यांना वाट पाहावी लागली. २४ डिसेंबरला ही यादी प्रसिद्ध झाली आहे. यादीत समावेश असणाऱ्या शेतकऱ्यांनी आवश्यक असणारी ई-केवायसी प्रक्रिया तातडीने करून घेतली आहे. मात्र, त्यांच्या बँक खात्यावर अद्याप रक्कम जमा झालेली नाही. या शेतकऱ्यांकडून रक्कम जमा झाली आहे का, हे पाहण्यासाठी बँकेचे हेलपाटे सुरू आहेत; पण प्रत्येक वेळी त्यांच्या पदरी निराशाच पडत आहे.
------------
* अद्याप ३० टक्के दूरच...
शेतकरी कर्जमुक्ती प्रोत्साहन योजनेच्या पहिल्या यादीत २०१७-१८, २०१८-१९ मधील शेतकऱ्यांचा समावेश होता. तर, दुसऱ्या यादीत या दोन वर्षांतील शिल्लक व २०१९-२० मधील शेतकऱ्यांचा समावेश आहे. मात्र, अद्यापही सुमारे ३० टक्के प्रामाणिक शेतकरी लाभापासून दूरच असल्याचे सांगण्यात येते. प्रोत्साहन योजनेच्या अंमलबजावणीची सध्याची कूर्मगती पाहता त्यांच्या हातात रक्कम कधी पडणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: 'ती भटकती आत्मा कोण PM मोदींना विचारणार', शरद पवारांवर केलेल्या अप्रत्यक्ष टीकेवर अजित पवारांची प्रतिक्रिया

Mumbai Lok Sabha: मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून रवींद्र वायकर शिवसेनेचे उमेदवार

T20 WC 24 Team India Squad : ना अय्यर... ना राणा... शाहरुख खानने 'या' खेळाडूला संघात घेण्याची केली मागणी

Karmaveerayan: 'कर्मवीरायण' मधून उलगडणार कर्मवीर भाऊराव पाटील यांचं जीवनचरित्र; 'या' दिवशी रिलीज होणार चित्रपट

Healthy Menopause: हेल्दी मोनोपॉझसाठी 'या' नैसर्गिक उपायांचा करा वापर, मिळतील अनेक फायदे

SCROLL FOR NEXT