कोल्हापूर

सांगली

CD

सांगली टुडे १ वरून........लोगो - विकासाचा आशियाई मार्ग ः भाग २


74660

नव्या आराखड्यात थेट सेवा रस्ते
अपघात टाळण्यासाठी उपायांवर भर; महापुरासाठी उंची वाढविणार

दीपक पवार, सकाळ वृत्तसेवा
इटकरे, ता. १६ ः आशियाई महामार्गाच्या सातारा ते कागल टप्प्याचे सहापदरीकरण सुरु झाले आहे. या भागात अन्य राज्यांतून यंत्रसामग्री आली आहे. १७ वर्षांपूर्वी झालेल्या चौपदरीकरणात सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात ठराविक ठिकाणीच सेवा रस्ते करण्यात आले. जेथे सेवा रस्ते झाले नाहीत, तेथील नागरिक अनेक समस्यांना आजही तोंड देत आहेत. अंतर वाचविण्यासाठी स्थानिकांचा उलट्या दिशेने प्रवास सुरू राहिला. तो, लांब पल्ल्याच्या वाहनांना मोठा अडथळा ठरत आहे. अपघात वाढले, सेवा रस्ते नसल्याने उंचीवरील मुख्य महामार्गावर सखल शेतातून ऊस वाहतूक करणे कसरतीचे झाले. नव्या आराखड्यात सर्वत्र थेट सेवा रस्ते आहेत. सातारा ते कागल दोन्ही शहरे १२७ किलोमीटर दुतर्फा सेवा रस्त्याने जोडली जाणार आहेत.
पूर्वीच्या दुप्पट म्हणजे साडेसात मीटर रुंदीचा सेवा रस्ता होणार आहे. सर्व स्थानिक वाहतूक या रस्त्यानेच व्हावी, हा उद्देश आहे, त्याव्दारे महामार्गावरील प्रवास सुरक्षित, कमी अवधीचा व बचतीचा असेल, असे धोरण आहे. सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात उद्‌भवलेल्या पूर परिस्थितीचा अभ्यास प्राधिकरणाने केला आहे. तांदूळवाडी ते कणेगाव, किणी टोल नाका परिसर, शिरोलीजवळ सांगली फाटा येथे पुराचे पाणी येते. दोन वर्षांपूर्वी तब्बल १२ दिवस वाहतूक खोळंबली होती. यावर कायमस्वरुपी उपाययोजनेचा प्रयत्न आहे. तेथे रस्त्याची उंची वाढवण्यात येणार आहे.

झाडांसाठी मोजकीच जागा...
या सर्व कामांचा दर्जा, गुणवत्ता तपासण्यासाठी केंद्रीय तांत्रिक विभाग निरीक्षक आहे. महामार्ग पथदिव्यांनी उजळणार आहे. बस थांबे, गर्दीच्या ठिकाणीही पथदिव्यांचे नियोजन आहे. रस्त्याचे २००५ मध्ये चौपदरीकरण झाले. त्यावेळी उपलब्ध जागेत झाडे लावली. ती चांगली वाढलीत. आता ही झाडे रुंदीकरणात निघतात. पर्यावरण विभागाच्या नियमाने रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपण करायचे आहे. आता उर्वरित जागेत सेवा रस्ते होणार असल्याने मोकळी जागा किती असेल, हा प्रश्न आहे. दोन्ही बाजूस एकूण ६० मीटर जमीन संपादित केली आहे. ५८ मीटरपर्यंत रस्ते येतात. उर्वरित १-१ मीटर जागेत किती झाडे लागणार, हा प्रश्न आहे. यावरून या प्रकल्पास संपादित जमीन कमी पडते, असा अर्थ आहे.


सातारा-कागल प्रकल्प ‘बीओटी’ तत्त्वावर
हा प्रकल्प ३ हजार २५५ कोटींचा असून तो बीओटी तत्त्वावरील आहे. दोन ठेकेदार कंपन्यांनी गुंतवलेली रक्कम ‘टोल’ स्वरुपात वसूल करायची आहे. यासाठी सातारा जिल्ह्यात तासवडे व कोल्हापुरात किणी असे दोन टोल नाके आहेत.

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग, प्राधिकरणाच्या अखत्यारित सहापदरीचे काम सुरू आहे. शेंद्रे ते पेठ व पेठ ते कागल टप्प्यातील काम दोन एजन्सीकडून होत आहे. रस्ते विभाग, प्राधिकरण, प्रशासन, ठेकेदार व स्थानिकांच्या सहकार्यातून उद्दिष्टपूर्ती करेल.
-चंद्रकांत भर्डे, व्यवस्थापक, प्रकल्प कार्यान्वयन युनिट, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI SuryaKant Statement : नवी मुंबई विमानतळ नामकरावरून सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे महत्वपूर्ण वक्तव्य; "धमक्या दिला तर कारवाई"

India Squad vs Afghanistan: नव्या दमाचा कसोटी संघ; वन डे संघातही प्रयोग, रोहित शर्मा, हार्दिक यांचा....

Mumbai News: दादर स्थानक बनणार अधिक सुरक्षित, वेगवान ! ३४ वर्षे जुनी सिग्नल प्रणाली बदलली

Nagpur Truck Accident: विटा घेऊन जाणारा ट्रक पलटी; तीन मजुरांचा जागीच मृत्यू, तीन जखमी

Latest Marathi News Live Update : काँग्रेसमधील अंतर्गत कलहाला कंटाळून सुधाकर भारसाकळे यांचा तालुकाध्यक्ष पदाचा राजीनामा

SCROLL FOR NEXT