कोल्हापूर

कर्नाटक मुख्य न्यायाधिश सत्कार बातमी

CD

77610
निपाणी ः येथे कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्यन्यायमूर्तीपदी प्रसन्ना बी वराळे यांचा जिल्हा बार असोसिएशनतर्फे सत्कार करण्यात आला. या वेळी अध्यक्ष ॲड. गिरीश खडके व पदाधिकारी उपस्थित होते.

कर्नाटक उच्चन्यायालयाचे
मुख्यन्यायमूर्ती वराळे यांचा सत्कार
कोल्हापूर ः कर्नाटक उच्च न्यायालयाच्या मुख्यन्यायमूर्तीपदी प्रसन्ना बी वराळे यांची नुकतीच निवड झाली. त्याबद्दल कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनतर्फे राजा शिवछत्रपती भवन निपाणी येथे त्यांचा सत्कार करण्यात आला. बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. गिरीश खडके व सचिव ॲड. विजयकुमार ताटे-देशमुख यांच्या हस्ते सत्कार झाला. मुख्यन्यायमूर्ती प्रसन्ना वराळे यांनी उच्च न्यायालय मुंबई येथे न्यायमूर्ती म्हणून कामकाज पहिले आहे. खंडपीठ कृती समितीची जेंव्हा मुख्यन्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांच्या बरोबर बैठक झाली तेंव्हा प्रसन्ना वराळे उपस्थित होते. त्यामुळे त्यांना कोल्हापूर सर्किट बेंचचा प्रश्न पूर्ण माहीत आहे. प्रसन्ना वराळे हे निपाणीचे सुपुत्र आहेत. या नात्याने निपाणी बार असोसिएशनने त्यांचा सत्कार समारंभ आयोजित केला होता. न्यायमूर्ती सचिन एस. मगदूम, न्यायमूर्ती के. एस. हेमलेखा, न्यायमूर्ती अनिल बी. कट्टी, कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे सचिव विजयकुमार ताटे-देशमुख, महिला प्रतिनिधी ॲड. तृप्ती नलवडे, ॲड. महांतेश कोल्हे, निपाणी बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. आर. एम. पाटील, ॲड. एम. व्ही. कुलकर्णी, ॲड. व्ही. के. शिंदे, ॲड. एस. ए. पाटील, ॲड. मंदार कुलकर्णी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karan Bhushan Singh: ब्रिजभूषण सिंहच्या मुलाच्या प्रचार रॅलीत फायरिंग? चौकशीतून काय समोर आलं?

Vada Pav Girl: ना अटक झाली, ना केस.. मग वडापाव गर्लला का घेऊन गेले दिल्ली पोलीस? व्हायरल व्हिडीओमागचं जाणून घ्या

Viral Video: शिक्षिकेला शाळेत उशिरा येणे पडलं महागात, मुख्याध्यापिकेने केली मारहाण, कपडेही फाडले

Latest Marathi News Live Update : केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी वलसाडमध्ये जाहीर सभेला संबोधित केले

Tesla vs Tesla: ट्रेडमार्कवरून पेटला वाद! टेस्ला भारतीय कंपनीविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात; काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT