कोल्हापूर

गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या तिघांना अटक

CD

३ फोटो आहेत.
...


गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या तिघांना अटक

गोकाक कनेक्शन होणार उघड ? ः एकाचा शोध सुरू

सकाळ वृत्तसेवा

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १३ ः गावठी बनावटीचे पिस्तूल बाळगणाऱ्या तिघांना आज पोलिसांनी अटक केली. रोहितराज लक्ष्मण भोसले (वय २५, नवा राजवाडा रोड रा. नागाळा पार्क), अरबाज सिकंदर मुल्ला (वय २५, रा. जाधव भवनजवळ, आंबेवाडी), शफात ईशादअहमद तरासगर (वय २४, रा. गोकाक, जि. बेळगाव) अशी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत. तर सचिन शिरगाव (रा. गोकाक, जि. बेळगाव) याचा शोध सुरू आहे. याची नोंद करवीर पोलिस ठाण्यात झाली.
पोलिसांनी सांगितले, की रोहितराज भोसले हा आंबेवाडी रस्त्यावरील एका शेळी पालन फार्मच्या समोर येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्याच्याकडे कोणत्याही प्रकारचा परवाना नसतानाही तो गावठी बनावटीची पिस्तूल बाळगतो, अशी माहिती पोलिसांना कळाली. त्यानुसार पोलिसांनी वडणगे येथे छापा टाकून तिघांना अटक केली. त्यांच्याकडील गावठी बनावटीची दोन पिस्तूल, तीन मोबाईल असा सुमारे १ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आणखी एकाचा शोध सुरू असून त्याचे गोकाक कनेक्शन असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्यानुसार पोलिसांनी अधिक माहिती घेण्याचे काम सुरू केले आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी ही कारवाई केली असून, करवीर पोलिस ठाण्यात याची नोंद केली आहे.
-------

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

Shreyas Talpade: कोरोना लसीमुळे हृदयविकाराचा झटका आला? श्रेयस तळपदे म्हणाला,'लस घेतल्यानंतर मला...'

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : चाहरनं सीएसकेला पाडलं खिंडार, ऋतुराज पाठोपाठ दुबेलाही केलं बाद

Lok Sabha : 'एक भाकरी, एक रूपया द्या.. एका भिक्षुकाला पंतप्रधान करा' म्हणणाऱ्या विजयप्रकाश कोंडेकरांकडे किती आहे संपत्ती?

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी यांनी वायनाडच्या लोकांशी केलेली फसवणूक - गौरव वल्लभ

SCROLL FOR NEXT