कोल्हापूर

दि न्यू एज्युकेशन सोसायटीच्या शतक महोत्सवी वर्षाची रविवारी सांगता

CD

‘न्यू एज्युकेशन सोसायटी’च्या
शतकमहोत्सवी वर्षाची रविवारी सांगता

केंद्रीय गृहमंत्री शहा यांची प्रमुख उपस्थिती

कोल्हापूर, ता. १६ ः शैक्षणिक, कला-सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्रात दि न्यू एज्युकेशन सोसायटीने वेगळा ठसा उमटवित स्थापनेची शतकपूर्ती केली आहे. या सोसायटीच्या शतक महोत्सवी वर्षाचा सांगता कार्यक्रम रविवारी (दि. १९) दुपारी अडीच वाजता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत पेटाळा येथे होणार आहे. सोसायटीची वाटचाल मांडणाऱ्या ‘शतसंवत्सरी’ या स्मरणिकेचे प्रकाशन होईल, अशी माहिती या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष विनोदकुमार लोहिया यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली.
लोहिया म्हणाले, ‘या कार्यक्रमास केंद्रीय मंत्री शहा यांच्या पत्नी सोनल, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री दीपक केसरकर प्रमुख उपस्थित, तर उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील अध्यक्षस्थानी असतील. स्मरणिका प्रकाशन आणि व्हाईट आर्मीचे संस्थापक अशोक रोकडे, आंतरराष्ट्रीय नेमबाज अनुष्का पाटील, गिर्यारोहक कस्तुरी सावेकर, गुणवंत विद्यार्थिनी सिद्धी आवटे (इयत्ता दहावी), काजल कोथळकर (इयत्ता बारावी) यांचा सत्कार केंद्रीय मंत्री शहा यांच्या हस्ते होईल.
सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष निर्मल लोहिया म्हणाले, ‘सोसायटीची १ फेब्रुवारी १९२१ ला स्थापना झाली. शिक्षणक्षेत्रासह सामाजिक बांधिलकी जपत संस्थेने विविध क्षेत्रात प्रगतीची नवनवीन शिखरे पादाक्रांत केली.’
नियामक मंडळाचे उपाध्यक्ष नितीन वाडीकर, सोसायटीचे सचिव प्रभाकर हेरवाडे, सहसचिव डॉ. सूर्यकांत चव्हाण, मोहन भांडवले, सयाजी पाटील, प्रदीप पोवार उपस्थित होते.

चौकट
वाटचाल मांडणारी स्मरणिका
सोसायटीने शतकमहोत्सवी वर्षात विविध सांस्कृतिक कार्यक्रम, उपक्रम राबविले. त्यांचा आणि संस्थेची शंभर वर्षांची वाटचाल, अध्यक्ष आणि सचिवांची कामगिरीचा आढावा, भविष्यातील व्हीजन या ‘शतसंवत्सरी’ स्मरणिकेत मांडले असल्याचे सचिव हेरवाडे यांनी सांगितले. मान्यवर, निमंत्रितांच्या वाहनांच्या पार्किगसाठी न्यू कॉलेजच्या मैदानावर व्यवस्था केल्याचे सहसचिव चव्हाण यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Viral Video: ट्रेन समोर… तरीही थांबले नाहीत! मुलुंड स्टेशनवर ट्रॅकवरच सुरू ‘फिल्मी’ मारामारी, थरकाप उडवणारा व्हिडिओ व्हायरल

एकता कपूर यांनी त्यांच्या कथांना महिला सशक्तीकरणाचे माध्यम असल्याचे सांगितले, मांडला आपला दृष्टिकोन

Australia Cricket Contract: ऑस्ट्रेलियाच्या करारात २१ खेळाडूंनाच स्थान; मॅक्सवेलसह नामांकित खेळाडूंना वगळलं; पाहा संपूर्ण यादी

Stock Market Today: ट्रम्पच्या भूमिकेमुळे शेअर बाजारात जोरदार उसळी! Indigo चे शेअर्स चर्चेत

Latest Marathi News Live Update : केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी 'ओडिशा स्थापना दिना'निमित्त दिल्या शुभेच्छा

SCROLL FOR NEXT