कोल्हापूर

निधन

CD

03294
रामभाऊ मगदूम यांचे निधन
सरवडे, ता. २० : नरतवडे (ता. राधानगरी) येथील रहिवासी, साखर कामगार सभेचे (कोल्हापूर) अध्यक्ष आणि आदमापूर येथील संत बाळूमामा देवस्थान समितीचे कार्याध्यक्ष रामभाऊ बापूसाहेब मगदूम (वय ८१) यांचे निधन झाले. ते समाजवादी चळवळीत कार्यरत होते. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे, मुलगी, सुना व नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवारी (ता. २२) आहे. आदमापूरचे बाळूमामा मंदिर व परिसर विकासासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. त्यांच्या संकल्पनेतून भक्तांसाठी नवीन हार्बर मंदिर, भक्त निवास, रुग्णालय, दर्शन मंडप उभे करण्यात आले. नरतवडे येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

83900
पांडुरंग जाधव
कोल्हापूर : कसबा बावडा येथील पांडुरंग शंकर जाधव (वय ७२) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुलगे, मुलगी, सून व नातवंडे असा परिवार आहे. ‘सकाळ’चे ते निवृत्त कर्मचारी होत. रक्षाविसर्जन बुधवारी (ता. २२) कसबा बावडा स्मशानभूमीत आहे.

83887
रंगराव हिर्डेकर
बाजार भोगाव (ता. पन्हाळा) : येथील रंगराव बाबू हिर्डेकर (वय ८५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे, दोन मुली, सुना व नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवारी (ता. २२) आहे.

83973
बाळकृष्ण हुर्डेकर
कोल्हापूर : जाधववाडी घोडकेवाडी येथील बाळकृष्ण लक्ष्मण हुर्डेकर (सावकर) (वय ७९) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, तीन मुली, दोन मुलगे, सुना व नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवारी (ता. २२) बापट कॅम्प स्मशानभूमीत आहे.

83934
शांताबाई कुईगडे
कोल्हापूर : रविवार पेठ येथील शांताबाई मनोहर कुईगडे (वय ८२) यांचे निधन झाले. रक्षाविसर्जन मंगळवारी (ता. २१) आहे.

02159
मारुती जाधव
शिरगाव : येथील मारुती संभाजी जाधव (वय ८६) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे सून, विवाहित मुलगी व नात असा परिवार आहे.

01963
हरी गुरव
कसबा तारळे : दुर्गमानवड (ता. राधानगरी) येथील हरी दादू गुरव (वय ८४) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुलगे, मुलगी, सुना व नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवारी (ता. २२) आहे.

02418
मंजुळा पेडणेकर
आजरा : सोहाळे (ता. आजरा) येथील मंजुळा गणू पेडणेकर (वय ८०) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुलगे, सुना व नातवंडे असा परिवार आहे.

02157
सानिका पाटील
कसबा बीड : शिरोली दुमाला (ता. करवीर) सानिका प्रल्हाद पाटील (वय १८) हिचे निधन झाले. तिच्या मागे आई, वडील, भाऊ, आजी, आजोबा असा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवारी (ता. २२) आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iraq: इराकमध्ये समलैंगिक संबंधाना गुन्हा ठरवणारा कायदा मंजूर; तब्बल इतक्या वर्षांचा होणार तुरुंगवास

Loksabha 2024: मतदानाचा घसरलेला टक्का कुणाच्या पथ्यावर? वाचा काय सांगतो लोकसभेचा इतिहास 

Latest Marathi News Live Update: किरकोळ बाजारात तूरदाळीचे दर दहा टक्क्यांनी वाढले

Hassan Sex Scandal: माजी पंतप्रधानांच्या नातवाच्या अश्लील व्हिडिओ प्रकरणी एसआयटी स्थापन करण्याचा निर्णय, मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती

Sakal Podcast : सुळे विरुद्ध पवार, बारामती नेमकी कोणाची? ते कांदा निर्यातबंदी उठवली हा जुमलाच

SCROLL FOR NEXT