कोल्हापूर

पंचमहाभूत लोकोत्सव

CD

पृथ्वी कक्षात १२५ दुर्मिळ वनौषधी

शिवाजी यादव ः सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २२ : बदलत्या जीवनशैलीत आजारपण जडले की, औषधोपचाराचे विविधांगी सल्ले, माहिती ऐकूण मती गुंग होते. मात्र, घरच्या घरी वनौऔषधीची लागवड केल्यास बहुतांशी आजार प्राथमिक अवस्थेत बरे करण्यासाठी वनौषधीचा वापर गुणकारी ठरतो. काही आजार दूर ठेवून आरोग्य तंदुरुस्त ठेवण्यास मदत करतात. अशा जवळपास १२५ प्रकारच्या वनौषधींच्या लागवडीचे महत्त्‍व कणेरीमठ येथे भरलेल्या सुमंगलम्‌ पंचमहाभूत लोकोत्सवात पृथ्वी मंडपातून समजून घेता येत आहे.
महोत्सवातील पहिल्याच कक्षात पृथ्वी, आकाश, ऊर्जा, जल, वायू अशा पंचमहाभूताचे तत्त्‍व मानवी आरोग्याशी जोडले आहे. त्याची शास्त्रीय मांडणीद्वारे अवघड बाबी सोप्या पद्धतीने समजावून दिल्या आहेत. वड, पिंपळ, अश्वगंध, माण, कदू, भारंगी, सुरण बेल, अंजीर, मांडूळपर्णी, प्लक्ष, हंसपदी, मेहंदी, कमल, उशीर, खैर, ब्राम्ही, भारंगी, कारळ, भुईमूग, पलाश, पळस, बावची, गुंजा, लंवग, तुलसी, राळ, नागकेशर, पपई, कवठ, एरंड, लता करंज, कुणकी, गोरख मुंडी, तण, गोकर्ण, सर्पगंधी, कलाहटी, मुळ, द्रोणपुष्पी, दुग्धीका, आंबा अशी जवळपास १२५ वनौषधीची रोपेच येथे लावली आहेत. यातील बहुतांशी रोपं शेती, जंगल व नागरीवस्तीत आढळतात. वाढत्या नागरिकरणात अनेक झाडे नामशेष झाली. मात्र, त्यापैकी काहींचे अस्तित्व पश्चिम घाटात आहे. काही दुर्मिळ झाडे रस्त्याकडेला दिसतात. मात्र त्याच्या गुणधर्मांची माहिती नसल्याने वाढत्या शहरीकरणात झाडे तुटली. यातून नामशेष होणारी झाडे जंगलातून शोधून त्याचे जतन करण्यासाठी निसर्गप्रेमी प्रयत्न होत आहेत. यातून दुर्मिळ झाडांची रोप, बिजांकुर बीज लागवडीसाठी देण्यात येत आहेत.
सर्दी, खोकला, ताप, विषबाधा, निद्रानाश, सांधेदुखी, डोकेदुखी, पोटविकार, किडणी विकार अशा अनेक रोगांची प्राथमिक लक्षणे दिसताच वनौषधींचा वापर आयुर्वेद तज्ज्ञांच्या सल्ल्याने केल्यास लक्षणे दूर होण्यास मदत होते. आयुर्वेदिक औषधासाठी झाडांची फुले, मुळ, साल, फळे, बियांचा वापरातून काढा, गोळ्या बनवल्या जातात. त्यासाठी दुर्मिळ वनौषधीची लागवड हिताची ठरते. कोणत्या झाडाचा कोणत्या आजारावर औषध म्हणून वापर होऊ शकतो याची शास्त्रीय माहिती पृथ्वी कक्षात मिळते.


कोट
वीस वर्षांत आयुर्वेद उपचार घेण्याचा कल दुप्पटीने वाढत आहे. परिणामी आयुर्वेद औषधांची मागणी वाढली, त्यासाठी वनौषधीचा वापरही होतो. अशा वनौषधी शोधणे, त्यांचे संर्वधन करणे, वापर करणे, निसर्गाचा समोतल राखणे अशा अनेक अंगाने वनौषधींचे महत्त्‍व समजून घेता येणे शक्य आहे.
-डॉ. ए. ए. पाटील, एमडी आयुर्वेद

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CISCE Result 2024 : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल जाहीर; एका क्लिकवर पाहा रिझल्ट

Kangana Ranaut: कंगनानं थेट बिग बींसोबत केली स्वत:ची तुलना; भाषणाचा व्हिडीओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली, म्हणाले..."

Viral Video: लाईक्ससाठी पेटवलं जंगल ! सोशल मीडियावर आगीचा व्हिडिओ अपलोड केल्या प्रकरणी तिघांना बेड्या

Manisha Koirala : उमरावजान साकारणार होती मल्लिकाजान ? मनीषाने सांगितली 18 वर्षांपूर्वीची गोष्ट

Harshit Rana KKR vs LSG : कारवाईनंतरही हर्षित राणा सुधरला नाही; बीसीसीआयला पुन्हा डिवचलं?

SCROLL FOR NEXT