कोल्हापूर

‘दिव्य ज्योत शक्ती, पूज्य भाव भक्ती’ म्हणजे शिरकाई देवी

CD

‘दिव्य ज्योत शक्ती, पूज्य भाव भक्ती’ म्हणजे शिरकाई देवी
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आणि सरसेनापती वीर बाजी पासलकर यांच्या ८४ मोसे खोऱ्यातील मावळ्यांचे कुलदैवत म्हणजे शिरकोलीची शिरकाई देवी. महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्यातील ८४ मोसे खोऱ्‍यातील मौजे शिरकोली गावची शिरकाई देवी. तारदाळ येथील ग्रामदैवत शिरकाई देवीचे ते मूळ पीठ होय. या देवीच्या दर्शनाला जाताना पुणे-स्वारगेटवरून पुणे- पानशेत-शिरकोली एस.टी.ने पानशेतवरून जलवाहतूक (बोट)ही आहे. पानशेत धरण आणि इथले निसर्गरम्य वातावरण आल्हाददायक व प्रसन्नपूर्ण आहे.
शिरकोलीतील शिरकाई मंदिरात असणारी मूर्ती काळ्या पाषाणात महिषासुरमर्दिनी रूपातील आहे. या अष्टभुजा देवीने एका हातात महिषासुराची शेंडी पकडली आहे. बाकीच्या हातात शंख, चक्र, त्रिशूल, पाणपत्र, बिछवा, धनुष्य व बाण आहे. देवीचा डावा पाय रेड्याच्या पाठीवर आहे. देवीची यात्रा चैत्र पौर्णिमेच्या प्रतिपदेस भरते. शिरकोली गावी यात्रेला भक्तांची गर्दी होते. नवरात्रीला नऊ दिवस विविध धार्मिक आणि पारंपरिक कार्यक्रम होतात. अष्टमीला जागरण, होमहवन होऊन दशमीला सोने लुटून दसऱ्या‍च्या दिवशी लेकी-सुना दोऱ्‍याला बांधलेली खोबऱ्‍याची वाटी देवीला अर्पण करतात, ही पूर्वपरंपार प्रथा आहे. दसऱ्याच्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य देवीला दाखविला जातो. यात्रेला आलेल्या भक्तांना दिवसभर महाप्रसादाचे वाटपही केले जाते. शिरकाई, मानाई व वाघजाई या तिन्ही देवींचे दर्शन येथे भक्तांना घडते. देवीच्या बाजूला भक्तांचे संकट दूर करणारे रक्षक आहेत. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील ग्रामदैवत शिरकाई देवी म्हणजेच तारदाळ येथील असणारे शिरकाई देवीचे मूळ पीठ असावे, असे अभ्यासक सांगतात.

‘दिव्य ज्योत शक्ती, पूज्य भाव भक्ती’ म्हणजे शिरकाई देवी
शिरकोलीचे शिरकाई देवी मंदिर हे शिवकालीन मंदिर असून, ते अंबी नदीकाठी वसलेले आहे. मंदिराच्या उजव्या बाजूस रायगड किल्ला, तर डाव्या बाजूस राजगड, तोरणा किल्ला आहे. शिरकाई देवीच्या समोरच्या बाजूस खडकवासला धरण आहे. सिंहगड, ओसाड जाईला वंदन करून ए. जे. तानाजी सागर म्हणजेच पानशेत धरण (वीर बाजी पासलकर धरण) लागते. पानशेत धरण पुनर्वसनात मंदिराला पाणी लागल्याने शिवकालीन मंदिराची मूर्ती विधीवत प्रतिष्ठापना करून नवीन बांधलेल्या मंदिरात स्थापन केली, हे शिरकोलीचे शिरकाई मंदिर आहे. शिरकाईच्या डाव्या बाजूला मानाई, तर समोरच वाघजाई देवी दर्शन देते. शिरकाईला पडवळ, पासलकर, भोसले, साळेकर, आमगुडे, निवंगुडे, कडू, कुंभार, कदम, मानकर, राजेशिर्के, बोरगे, हेळदकर, माने, मोरे, तावरे, लोहकरे, नरावडे आदी १२ बलुतेदार कुलदैवत मानतात.

देवीचा शिवकालीन इतिहास
शिरकाई देवीचा महिमा अपरंपार आहे. मौसे खोऱ्‍यात मावळ्यांचा सिंहाचा वाटा होता. मंदिराच्या दिवाबत्तीचा खर्च राजगडावरून येत होता. जिजाऊ माता व छत्रपती शिवराय देवीला स्फूर्तिस्थान मानायचे. देवीच्या स्फूर्तीने कोकणच्या कोळी राजाच्या त्रासातून मौसे खोरे मुक्त केले. मावळमढा कोळी राजाच्या त्रासाने हैराण झाला होता. त्रासातून मुक्त होण्यासाठी मावळ्यांची बैठक झाली. बैठकीचे नेतृत्व वीर बाजी पासलकर यांनी केले. आई शिरकाईने विजय निश्चितीचा कौल दिला. कोळी राजाला निमंत्रण देऊन शिरकोलीला म्हणजेच विलालपूर माळाला कोळी राजाला बोलावले. शिरकोली गावचे गावकरी म्हणजेच पासलकर, पडवळ, साळेकर वराडी झाले. यासाठी शामियाना उभारला. कोळी राजा शिरकोली गावी निघाला. त्याच्या पाळतीवर केदळकर, बामुगडे, कडू, निवंगुणे दबा धरून बसले. मानकर, तावरे, नरावडे, लोकरे, सांगडे, हरेकर आदी त्यांच्या साथीला होते. यात कोळी राजावर हल्ला करून मावळ्यांनी विजय मिळवून पराभव केला व त्याच्या त्रासातून मोसे खोरे मुक्त केले. या वेळी शिरकाई देवीचे वरदान सफल झाले. त्या वेळेपासून शिरकाईला नवसाला पावणारी व हाकेला धावणारी आई शिरकाई असे संबोधण्यात आले. त्या वेळेपासून शिरकाई देवीची यात्रा मोठ्याने भरते. या यात्रेच्या पालखीचा मान पासलकर कुटुंबीयांना आहे, असे इतिहास सांगतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

Shreyas Talpade: कोरोना लसीमुळे हृदयविकाराचा झटका आला? श्रेयस तळपदे म्हणाला,'लस घेतल्यानंतर मला...'

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : अर्शदीपचा अप्रतिम यॉर्कर अन् रहाणे झाला बाद

Lok Sabha : 'एक भाकरी, एक रूपया द्या.. एका भिक्षुकाला पंतप्रधान करा' म्हणणाऱ्या विजयप्रकाश कोंडेकरांकडे किती आहे संपत्ती?

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी यांनी वायनाडच्या लोकांशी केलेली फसवणूक - गौरव वल्लभ

SCROLL FOR NEXT