कोल्हापूर

दोन सत्रातील शाळेच्या निर्णयाकडे लक्ष

CD

जिल्‍हा परिषद
- लोगो
...

दोन सत्रांतील शाळेच्या निर्णयाकडे लक्ष
सकाळ वृत्तसेवा
कोल्‍हापूर, ता. २८ : जिल्‍हा परिषदेच्या शाळा दोन सत्रांत सुरू ठेवण्याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्‍हाण यांनी आवाहन केले आहे. यावर शिक्षकांमधून उलटसुलट प्रतिक्रिया येत आहेत. काही शिक्षक संघटनांनी याला विरोध, तर काही संघटनांनी समर्थन केले आहे.
यावर आमदार प्रकाश आबिटकर, मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्‍हाण आणि निवडक शिक्षक संघटना प्रतिनिधींमध्ये चर्चा करण्यात आली. अखेर २८ शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक घेऊन, पुढील निर्णय घेण्याबाबत एकमत झाले. आमदार श्री. आबिटकर यांनी दोन सत्रांतील शाळेबाबत सर्वांशी चर्चा करून पुढील निर्णय करण्याबाबत सूचना केली.
जिल्‍हा परिषद शाळांचे अंतिम सत्र सुरू होत आहे. किमान दीड महिना हे सत्र सुरू राहील. या वेळी सकाळच्या सत्रात नियमित वर्ग घेण्यात यावेत; तर दुपारच्या सत्रात जे विद्यार्थी अभ्यासात मागे आहेत, विषयातील समज कमी आहे त्यांच्यासाठी वेळ द्यावा, असा प्रस्‍ताव मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. चव्‍हाण यांनी मांडला. त्यांच्या प्रस्‍तावाचे पालक तसेच अनेक शिक्षक व संघटनांनी स्‍वागत केले; तर नेहमीप्रमाणे या निर्णयाला विरोध करण्याची भूमिका काही शिक्षकांनी व निवृत्त शिक्षक नेत्यांनी घेतली आहे. यावर गेल्या आठवड्यात सविस्‍तर चर्चा करण्यात आली. तरीही वेगवेगळ्या माध्यमांतून हा निर्णय हाणून पाडण्याचे प्रयत्‍न सुरू आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uma Ramanan: तामिळ चित्रपटसृष्टीचा आवाज हरपला, दिग्गज गायिकेचे निधन

Prajwal Revanna: 'सेक्स टेप' प्रकरणी प्रज्वल रेवण्णा यांच्याविरोधात ग्लोबल लूकआऊट नोटीस जारी

PM Narendra Modi : 'मोदींचे निधन झाले तर कोणी पंतप्रधानच होणार नाही का?' काँग्रेस आमदाराचे पुन्हा वादग्रस्त विधान

Mumbai Loksabha: कोण मारणार मुंबईत बाजी? ठाकरेंचा आत्मविश्वास 'सातवे आस्मान'पे, भाजप मात्र संभ्रमात

Latest Marathi News Live Update : केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांचा फेक फोटो व्हायरल; स्वतःच सांगितलं सत्य

SCROLL FOR NEXT