कोल्हापूर

आमदार सतेज पाटील विधान परिषदेचे गटनेते

CD

काँग्रेसच्या विधान परिषद
गटनेतेपदी सतेज पाटील

कोल्‍हापूर, ता. ३ : राज्याचे माजी गृह राज्यमंत्री व विधान परिषद सदस्य सतेज ऊर्फ बंटी पाटील यांची काँग्रेसच्या विधान परिषद गटनेतेपदी नियुक्ती केली आहे. विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांनी ही नियुक्ती केल्याचे जाहीर केले. विधान परिषदेच्या उपसभापती नीलमताई गोऱ्हे यांनी आज सभागृहात त्यांच्या निवडीची घोषणा केली.
आमदार पाटील यांनी जिल्‍ह्यात पक्ष संघटना वाढीस चालना दिली आहे. २००९-१४ च्या आघाडी सरकारमध्ये त्यांनी राज्यमंत्री म्हणून काम पाहिले आहे. त्याचबरोबर २०१९ च्या महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांनी गृह राज्यमंत्री, ग्रामविकास, अन्न व औषध प्रशासन अशा विविध विभागांची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली आहे. काँग्रेसचे जिल्‍हाध्यक्ष झाल्यानंतर आमदार पाटील यांनी जिल्‍ह्यातील काँग्रेसला चालना दिली. तसेच स्‍थानिक स्‍वराज्य संस्‍थांच्या निवडणुकीतही पक्षाचा ठसा उमटवण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचे अत्यंत नावीन्यपूर्ण पद्धदतीने प्रसारण करून आमदार पाटील यांनी सर्व काँग्रेस जणांचे लक्ष वेधले होते.

कोट
काँग्रेस पक्षाने आजपर्यंत दिलेल्या जबाबदारीला न्याय देण्याचा आपण प्रयत्न केला आहे. आता पक्षाने गटनेतेपदाची जबाबदारी दिली आहे, या पदालाही न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जाईल. पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी आपल्यावर विश्वास व्यक्त केल्याबद्दल सर्व वरिष्ठांचे आभार.
सतेज पाटील, आमदार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

Shreyas Talpade: कोरोना लसीमुळे हृदयविकाराचा झटका आला? श्रेयस तळपदे म्हणाला,'लस घेतल्यानंतर मला...'

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : अर्शदीपचा अप्रतिम यॉर्कर अन् रहाणे झाला बाद

Lok Sabha : 'एक भाकरी, एक रूपया द्या.. एका भिक्षुकाला पंतप्रधान करा' म्हणणाऱ्या विजयप्रकाश कोंडेकरांकडे किती आहे संपत्ती?

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी यांनी वायनाडच्या लोकांशी केलेली फसवणूक - गौरव वल्लभ

SCROLL FOR NEXT