कोल्हापूर

इएसआयसी

CD

86873
...

‘ईएसआयसी’ने कामगारांना चांगल्या सेवा द्याव्यात
---
खासदार संजय मंडलिक; सहा जिल्ह्यांच्या प्रशासकीय कार्यालयाचे उद्‍घाटन

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ४ ः ‘कामगार हे कुटुंबातील घटक आहेत, अशा धारणेने उद्योजक त्यांची काळजी घेतात. ईएसआयसी प्रशासनाने या कामगारांना आरोग्याच्या चांगल्या सेवा द्याव्यात. त्यासाठी साधनसामग्री देण्यासाठी केंद्र सरकारकडून मदत होत आहे. त्या आधारे अधिक प्रभावी सेवा द्यावी,’ अशी अपेक्षा खासदार संजय मंडलिक यांनी व्यक्त केली.
‘ईएसआयसी’च्या सहा जिल्ह्यांच्या प्रशासकीय कार्यालयाचे आज येथील ताराबाई पार्कातील क्रिस्टल प्लाझात उद्‍घाटन झाले. या वेळी ते बोलत होते. या वेळी खासदार धैर्यशील माने, विश्वविजय खानविलकर उपस्थित होते. या प्रशासकीय कार्यालयामुळे कोल्हापूरसह सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग व सोलापूर या जिल्ह्यांतील तीन लाख कामगारांचा लाभ होणार आहे. ‘ईएसआयसी’च्या विमाधारक कामगारांना त्यांच्या उपचारांची बिले, रजा कालावधीतील वेतनासंबंधीचे कामकाज येथे होईल.
खासदार मंडलिक म्हणाले, की गेल्या काही वर्षांपूर्वी ‘ईएसआयसी’ इमारतीची भयावह स्थिती होती. ती बदलण्यासाठी केंद्र सरकारकडे माझ्यासह तिन्ही खासदारांनी पाठपुरावा केला. त्यानंतर एक समिती नियुक्त झाली. या समितीने अभ्यास करून येथे कामगारांच्या आरोग्याच्या सुविधा देण्याचे काम टप्प्याटप्प्याने सुरू केले. हे रुग्णालय अधिक दर्जेदार करून येथे औषधोपचार, शस्त्रक्रियांपासून ते रक्तपेढीपर्यंतच्या सुविधा करण्यासाठी तयारी सुरू झाली. त्याचा लाभ जास्तीत जास्त कामगारांना होईल.
खासदार धैर्यशील माने म्हणाले, की नवीन कार्यालयामुळे दीड लाख कामगारांची सोय झाली आहे. कॉर्पोरेट लूकप्रमाणे नवे कार्यालय झाले. येथे कामही कॉर्पोरेट लूकप्रमाणे व्हावे. यात कामगारांचे विमा दावे पूर्ण करण्यास विलंब होऊ नये. यापुढील टप्प्यात कोल्हापुरात १५० खाटांचे रुग्णालय होईल. त्याबरोबर इचलकरंजीतही १०० खाटांचे रुग्णालय व्हावे, यासाठी श्री. मंडलिक यांनी पाठपुराव्यास सहकार्य करावे. हातकणंगले येथे सॅटेलाईट पोर्ट सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. केंद्रीय पथकाने पाहणी केली आहे. त्याचाही लाभ होईल.
‘ईएसआयसी’चे समन्वयक विज्ञानंद मुंढे म्हणाले, की कोल्हापूरची ‘ईएसआयसी’ रुग्णसेवा देशातील ‘रोल मॉडेल’ ठरावी. उत्तम दर्जाच्या सेवा येथे उपलब्ध झाल्याने कामगारांना परतव्याची रक्कम जलद गतीने खात्यावर जमा व्हावी.
विविध औद्योगिक संस्था, संघटनांच्या सहकार्याने त्यांच्याच इमारतीत ‘ईएसआयसी’ रुग्णालय सुरू करण्याची श्री. मंडलिक यांची कल्पना केंद्रीय अधिकाऱ्यांना आवडल्याने त्याच्या अंमलबजावणीसाठी प्रयत्न होतील, असेही मुंढे यांनी सांगितले.
या वेळी चेंबर्स ऑफ कॉमर्सचे संजय शेटे, हर्षद दलाल, एम. वाय. पाटील, दीपक चोरगे, नितीनचंद्र दलवाई, शिवाजीराव पोवार, कमलाकांत कुलकर्णी, संगीता नलवडे, मोहन कुशिरे, संजय पेंडसे, रणजित पाटील आदी उपस्थित होते. जॉन डिसूझा यांनी आभार मानले.
...

‘ईएसआयसी’ रुग्णालय सेवेचा विस्तार
‘ईएसआयसी’ सोसायटीचे राज्य संचालक महेश वरूडकर म्हणाले, की खासदार मंडलिक यांच्या प्रयत्नांमुळे १४८ दवाखाने मंजूर झाले आहेत. त्यातील ८५ दवाखाने सुरू झाले. पुढील वर्षात आणखी ६३ दवाखाने सुरू होतील. येथील उद्योजक व कामगारांकडून राज्यात सर्वांत जास्त वर्गणी ‘ईएसआयसी’ कॉर्पोरेशनला जाते. त्यामुळे येथे अधिक चांगल्या सुविधा देण्यात येतील. सिटीस्कॅन सुविधा लवकरच सुरू होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Google Error : गुगल डाऊन! जगभरातील युजर्स त्रस्त; अमेरिकेतून 1400 तक्रारी

Yogi Adityanath : काँग्रेस सत्तेत आल्यास हिंदूंची विभागणी होईल - योगी आदित्यनाथ

IPL 2024, CSK vs PBKS: चेन्नईला पंजाबच्या गोलंदाजांनी रोखलं अन् फलंदाजांनी ठोकलं; ऋतुराजसेनेचा बालेकिल्ल्यात दुसरा पराभव

Loksabha election 2024 : जेडीयूचे माजी प्रदेशाध्यक्ष शशांक राव यांचा भाजपात प्रवेश; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

SCROLL FOR NEXT