कोल्हापूर

‘एकता’ संस्थेने सहकारात नावलौकीक वाढवावा

CD

ajr52.jpg
87127
पेरणोली (ता. आजरा) ः येथील एकता गृहतारण संस्थेचे उद्‍घाटन आमदार प्रकाश आबिटकर यांनी केले. सरपंच उषाताई जाधव, संस्थेच्या उपाध्यक्षा प्रियांका जाधव, उदयराज पवार, काॅ. संपत देसाई, राजेंद्र सावंत, संतोष जाधव आदी उपस्थित होते.
----------------
‘एकता’ संस्थेने सहकारात नावलौकीक वाढवावा
आमदार अबिटकर; पेरणोलीत विकासकामे, एकता गृहतारण संस्थेचे उद्‍घाटन
सकाळ वृत्तसेवा
आजरा, ता. ५ ः गावातील तरूणांनी एकत्र येत स्थापन केलेली एकता गृहतारण संस्था सभासदांच्या विश्वासाला पात्र ठरावी. भविष्यात संस्थेने प्रगतीचे उच्चांक गाठून सहकारात नावलौकिक वाढवावा, असे आवाहन राधानगरी मतदारसंघाचे आमदार प्रकाश अबिटकर यांनी केले.               
पेरणोली (ता. आजरा) येथे पाझर तलाव, धनगरवाडा रस्ता व वीज, ग्रामदैवत रवळनाथ मंदीर सुशोभिकरण, जलजीवन योजना, नावलकरवाडी रस्ता, तलाठी कार्यालय या पावणे सहा कोटींच्या विकासकामांचा व एकता सहकारी गृहनिर्माण संस्थेचे उद्‍घाटन झाले. आमदार आबिटकर यांनी मार्गदर्शन केले.
आमदार अबिटकर म्हणाले, ‘सध्या सामाजिक, सहकार क्षेत्रात काम करणारे तरुण कमी होत आहेत. पण येथील चित्र वेगळे आहे. आजऱ्यात सहकारी संस्था चांगल्याप्रकारे चालल्या आहेत. संस्थांमुळे अनेकांचे संसार फुलतात. यंदा कोणत्याही परिस्थितीत सर्फनाल्याचे पाणी अडवणार आहे. गारगोटी ते आजरा रस्त्याची तरतुदीसाठी मुख्यमंत्र्याकडे पाठपुरावा सुरू आहे.’ संस्थेच्या उपाध्यक्षा प्रियांका जाधव, जनता संचालक जयवंत कोडक, मुकुंद कांबळे, साळगाव सरपंच धनंजय पाटील यांचा सत्कार केला. 
माजी सभापती उदयराज पवार, संपत देसाई, सरपंच उषाताई जाधव, उपसरपंच उत्तम देसाई, सुभाष विभूते यांची भाषणे झाली. श्रीपतराव देसाई, राजेंद्र सावंत, पांडुरंग लोंढे, पांडुरंग जोशीलकर, जनार्दन देसाई, नाथ देसाई, भिमराव दळवी, संस्थापक संतोष जाधव, शिवाजी मस्कर, संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र कळेकर, उज्ज्वला मस्कर आदी उपस्थित होते. अविनाश जोशीलकर यांनी स्वागत केले. रवींद्र देसाई यांनी प्रास्ताविक केले. सुरेश दास यांनी सूत्रसंचालन केले. शेखर कळेकर यांनी आभार मानले.
---------------
मुलगीसाठी संस्थेकडून एक हजार रुपयांची ठेव
पेरणोली येथे मुलगी जन्माला आली तर संस्थेच्यावतीने एक हजार रूपयांची ठेव पावती करुन दिली जाईल, अशी घोषणा संस्थापक संतोष जाधव यांनी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Best Saving Plan : दिवसाला फक्त २५० रुपये सेव्हिंग करा अन् २४ लाख रुपये मिळवा; लखपती बनवणारी सरकारी स्कीम

MI vs KKR IPL 2024 : IPL मधून मुंबई इंडियन्सचा पत्ता कट होणे टीम इंडियासाठी ठरणार गोड बातमी? जाणून घ्या कारण

Pension Department: पेन्शनधारकांना मोदी सरकारची मोठी भेट! नवीन ऑनलाइन पोर्टल केले लाँच; मिळणार 'या' सुविधा

Latest Marathi News Live Update: राहुल गांधींना 'शेहजादा' म्हणणाऱ्या पंतप्रधान मोदींवर प्रियंका गांधींचा हल्लाबोल

Indian Navy : अरबी समुद्रात पुन्हा भारतीय नौदलाची हवा, 20 पाकिस्तानींसाठी ठरले देवदूत

SCROLL FOR NEXT