कोल्हापूर

डॉ. अरूण मोराळे स्मृती पुरस्कार वितरण

CD

87444

समाजातील चांगुलपणाचा गौरव आवश्यकच
डॉ. एम. बी. शेख : प्राचार्य खेबूडकर यांना समाजभूषण पुरस्कार

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता.७ : समाजातील चांगुलपणाचा गौरव होणे ही सध्याच्या काळाची प्रमुख गरज आहे. डॉ. अरुण मोराळे यांच्या स्मृतिदिनानिमित्त वनौषधी विद्यापीठ संस्थेने सुरू केलेला उपक्रम कौतुकास्पद असल्याचे मत उद्योजक डॉ. एम.बी. शेख यांनी व्यक्त केले. त्यांच्या हस्ते पहिला डॉ.अरूण मोराळे स्मृति समाजभूषण पुरस्कार चेतना अपंगमती संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य पवन खेबूडकर यांना प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
डॉ. शेख म्हणाले, " डॉ. मोराळे बालपणापासूनचे मित्र. त्यांच्यातील सकारात्मक ऊर्जा आणि जिद्द वाखाणण्याजोगी होती. शासकीय सेवेत असूनही त्यांनी सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून समाजातील गरजूंसाठी केलेले कार्य अनुकरणीय आहे."
बौद्धिक अक्षम मुलांच्या शिक्षण व पुनर्वसनासाठी प्राचार्य खेबुडकर यांनी केलेल्या कामाबद्दल त्यांचा गौरव झाला. ते म्हणाले," हा केवळ माझा एकट्याचा गौरव नसून चेतना परिवारातील विद्यार्थी, पालक अशा सर्व घटकांचा हा सन्मान आहे. प्रत्येकाने एकदा चेतना शाळेला अवश्य भेट द्यावी."
डॉ. अशोक वाली, डॉ. दिलखुष तांबोळी यांनी मनोगत व्यक्त केले. डॉ. मोराळे यांच्याबरोबरच्या वैयक्तिक मैत्रीबरोबरच त्यांच्या निमा संघटना, 108 रुग्णवाहिका आणि विविध सेवाभावी उपक्रमातील सक्रिय पुढाकार याविषयीच्या आठवणींना वनौषधी विद्यापीठ संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुनील पाटील यांनी उजाळा दिला.
डॉ. ऋषीकेश जाधव यांनी स्वागत केले. डॉ. शरयू पाटील यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. प्रणव पाटील यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunetra Pawar: बारामतीत सुनेत्रा पवारांची उमेदवारी भाजपच्या दबावातून दिली का? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

Rahul Gandhi Pune Sabha : ''मोदी आता ओबीसी असल्याचं सांगत नाहीत...'' राहुल गांधींनी पुण्याच्या सभेत सांगितलं कारण

MI vs KKR Live IPL 2024 : अय्यरची 70 धावांची खेळी, मुंबईसमोर विजयासाठी 170 धावांच आव्हान

SSC-HSC Result 2024 : सीबीएसईचा दहावी-बारावीचा निकाल २० मे नंतर होणार जाहीर

West Indies T20 WC 24 Squad : विंडीजच्या संघात सगळे स्टार मात्र इन फॉर्म जादूगारच मिसिंग

SCROLL FOR NEXT