कोल्हापूर

तनिष्का महिला दिन

CD

लोगो-
तनिष्का

87953
कोल्हापूर : मंगला काळे तनिष्का गटातर्फे हौसाबाई गवळी यांना ‘सकाळ-स्मार्ट सोबती’च्या संपादिका सुरेखा पवार यांच्या हस्ते हिरकणी सन्मान पुरस्काराने गौरविण्यात आले.

हिरकणीचा सन्मान
...अन् स्वलेखन स्पर्धा
---
महिला दिनानिमित्त मंगला काळे तनिष्का गटाचा उपक्रम
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ९ : वयाच्या ८६ व्या वर्षातही घरगुती कामाबरोबरच शेतीतील कामे लीलया करीत तरुणांना लाजवतील, अशी कामगिरी करणाऱ्या गवळीवाडी, कणेरी (ता. करवीर) येथील हौसाबाई ज्ञानदेव गवळी यांना मंगला काळे तनिष्का गटातर्फे हिरकणी सन्मान पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. महिला दिनानिमित्त हा कार्यक्रम घेण्यात आला. दरम्यान, महिलांसाठी स्वलेखन स्पर्धाही घेण्यात आली. या स्पर्धेतही महिलांनी उत्साहाने सहभाग घेतला.
कणेरी येथील हौसाबाई गवळी या वयातही डोंगरावर रोज जनावरांना चरण्यासाठी घेऊन जातात. रोजच्या कामांचा त्यांचा उरक वाखाणण्याजोगा आहे. त्यांचा हा आदर्श नव्या पिढीने घ्यावा, यासाठी मंगला काळे तनिष्का गटाने पुढाकार घेत त्यांचा महिला दिनानिमित्त सन्मान करण्याचा निर्णय घेतला. ‘सकाळ-स्मार्ट सोबती’च्या संपादिका सुरेखा पवार यांच्या हस्ते हौसाबाई गवळी यांचा सन्मान करण्यात आला. लक्ष्मीबाई टिपुगडे व लतिका काळे यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार देण्यात आला. स्मृतिचिन्ह, शाल व रोख रक्कम देऊन त्यांना गौरविण्यात आले. तसेच, शुभदा कामत यांच्या पुढाकाराने इंदिरानगर सेवावस्ती येथील बचत गटांमध्ये सक्रिय असलेल्या महिलांना रेवती जरग यांच्याकडून ओळखपत्रे प्रदान करण्यात आली.
सुरेखा पवार म्हणाल्या, ‘‘हौसाआजी यांचा या वयातील उत्साह पाहता महिला वर्गाला निश्‍चितच प्रेरणा मिळेल. धावपळीच्या युगात स्वतःकडे लक्ष दिले जात नाही. मात्र, हौसाआजी स्वतःचा फिटनेस ठेवून आजही शरीराची योग्य हालचाल होईल, याकडे लक्ष देतात. त्यांचा हा आदर्श निश्‍चितच नव्या पिढीने घ्यावा.’’
दरम्यान, ‘तनिष्का’ गटातर्फे घेण्यात आलेल्या स्वलेखन स्पर्धेत शुभदा कामत यांनी प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले. स्पर्धेसाठी डिजिटल भारतीय स्त्री, महिला आर्थिक सक्षमीकरण व महिला सुरक्षा हे विषय देण्यात आले होते. हेमलता बोरकर यांनी परीक्षण केले. रेवती जरग यांनी सूत्रसंचालन केले. या वेळी गटप्रमुख मंगला काळे, ‘तनिष्का’ समन्वयक राजेंद्र जाधव, दत्तात्रय गवळी, वसंत गवळी, सरिता गवळी, वैशाली गवळी व ‘तनिष्का’ सदस्या उपस्थित होत्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi : 'सामान्य नागरिकाच्या घराचं वीज बिल शून्यावर आणणं माझं ध्येय'; पंतप्रधान मोदींनी सांगितला फ्युचर प्लॅन

Latest Marathi News Live Update: राजन विचारे उमेदवारी अर्ज दाखल करायला निघाले; ठाकरेंची उपस्थिती

Mumbai News: महाराष्ट्र दिनानिमित्त दादरसह परिसरातील वाहतुकीत बदल, वाचा महत्वाची बातमी 

Viral Video: रायफल्सच्या धाकाने ताब्यात घेत जाळली कार, वाचा न्यायाधीशाच्या अपहरण आणि सुटकेचा थरार

Crime News: इन्स्टाग्रामवर यौवना अन् प्रत्यक्षात समोर आली दुसरीच बाई.. अपेक्षाभंगामुळे तरुणाने केली बेदम मारहाण

SCROLL FOR NEXT