कोल्हापूर

कमर्शिअल बँक

CD

कमर्शिअल बँकेसाठी १६.९५ टक्के मतदान
कोल्हापूर, ता. १२ : रंगपंचमी आणि सुटीचा दिवस असल्याने मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरवल्याने कमर्शिअल को-ऑपरेटिव्ह बँकेच्या १५ पैकी ११ जागांसाठी आज केवळ १६.९५ टक्के मतदान झाले. १८ हजार १३६ पैकी केवळ तीन हजार ७५ सभासदांनी मतदान केले. मतमोजणी उद्या (ता. १३) मार्केट यार्ड येथील शाहू सांस्कृतिक हॉलमध्ये सकाळी आठपासून सुरू होईल. प्रदीप मालगावे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले.
बँकेच्या १५ पैकी तीन जागा यापूर्वीच बिनविरोध झाल्या आहेत; तर उर्वरित ११ जागांसाठी १४ उमेदवार रिंगणात होते. आज सकाळी आठपासून आयर्विन ख्रिश्‍चन हॉलमध्ये मतदान झाले. मात्र, याला अल्प प्रतिसाद मिळाला. मतदान केंद्रावर मतदान अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना अक्षरशः ताटकळत बसावे लागत होते. ही निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी प्रयत्न झाले. याला यश आले नाही. त्यामुळे ११ जागांसाठी मतदान झाले. मतदान केंद्रावर कोणत्याही प्रकारची चुरस नव्हती, ईर्ष्या नव्हती किंवा मतदारांना ने-आण करण्यासाठी यंत्रणा नव्हती. उद्या सकाळी मतमोजणी होणार आहे. यासाठी १८ टेबलवर १०८ कर्मचारी व अधिकारी काम करतील. दुपारपर्यंत सर्व निकाल जाहीर केला जाण्याची शक्यता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT