कोल्हापूर

पाणी गळती

CD

88893

क्रांतीसिंह नाना पाटीलनगर
चौकात जलवाहिनीला गळती

कोल्हापूर, ता. १३ ः चंबुखडीहून आपटेनगर टाकीकडे जाणाऱ्या शुद्ध पाण्याच्या सोळा इंची वाहिनीला आज सकाळी क्रांतीसिंह नाना पाटीलनगर चौकात गळती उद्भवली. यामुळे इराणी खणीपासून आपटेनगर चौकापर्यंतच्या साऱ्या परिसरातील पाणीपुरवठा बंद राहिला. अचानक उद्भवलेल्या गळतीमुळे पाणी आले नसल्याने नागरिकांची तारांबळ उडाली.
फुलेवाडी रिंगरोडखालून चंबुखडीहून आपटेनगर टाकीकडे शुद्ध पाणी वाहून नेणारी वाहिनी जाते. आज सकाळी दहाच्या सुमारास त्या वाहिनीला क्रांतीसिंह नानापाटीलनगर चौकातील रस्त्याखाली गळती लागली. त्यामुळे रस्त्यावरून पाण्याचे पाट वाहू लागल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाला देण्यात आली. विभागाने तातडीने त्या वाहिनीचे पाणी बंद करून दुरूस्तीचे काम सुरू केले. आपटेनगर टाकीतून सानेगुरूजी परिसर, तुळजाभवानी कॉलनी, राजोपाध्येनगर, आपटेनगर आदी इराणी खणीपर्यंतच्या भागाला पाणीपुरवठा केला जातो. पाणी बंद केल्याने दिवसभर या भागातील पाणीपुरवठा बंद राहिला. इतर वाहिन्यांवरून काही भागात पाणी देण्याचा प्रयत्न करण्यात आला. दुरूस्तीचे काम रात्रीपर्यंत पूर्ण करून पहाटेपासून नियमित पाणीपुरवठा करण्याचे नियोजन केले आहे.

चौकट
रस्ता खराब झाल्याची चिंता
रिंगरोडवर शिंगणापूर योजनेचीही वाहिनी असून, तिला असलेल्या गळतीने पाणी वाहून जाण्याचे प्रमाण जास्त आहे. त्याच्या दुरूस्तीसाठी रस्ता ठिकठिकाणी खोदला होता. बरीच आंदोलने, निवेदने दिल्यानंतर नुकतेच त्या रस्त्याचे पॅचवर्क केले होते. आता या गळतीमुळे मुख्य चौकातील रस्ता खोदला आहे. आता त्याची दुरूस्ती केव्हा होणार याची चिंता परिसरातील नागरिकांना लागली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

IPL 2024: RCB चा आनंद गगनात मावेना! प्लेऑफमध्ये पोहचताच केला जोरदार जल्लोष, पाहा Video

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

SCROLL FOR NEXT