कोल्हापूर

राजाराम निवडणूक

CD

लोगो
...

जादा मतदार असलेली गावे ‘लक्ष्य’

‘राजाराम’ चा आखाडा ः प्रत्येक टप्प्यावर घेतली जातेय खबरदारी

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर, ता. १४ ः कसबा बावडा येथील छत्रपती राजाराम कारखान्याच्या निवडणुकीत मतदार जास्त असलेल्या गावांवर दोन्ही आघाड्यांनी आतापासूनच लक्ष केंद्रीत केले आहे. त्यासाठी मेळावे, सभासदांच्या गाठीभेटी आणि संपर्क अभियानातून मतदार जागृती सुरू आहे. मोठी गावे कोणाच्या मागे रहाणार यावर कारखान्याचा निकाल अवलंबून असेल.
‘राजाराम’ चा बिगुल आज जरी वाजला असला तरी दोन्ही आघाड्यांकडून त्याची तयारी गेल्या वर्षभरापासून सुरू आहे. या निवडणुकीत पुन्हा एकदा माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील विरूध्द माजी आमदार महादेवराव महाडीक यांनी एकमेकांविरुध्द शड्डू ठोकला आहे. श्री. पाटील यांनी बावड्यातील श्रीराम सोसायटीचे आजी-माजी संचालक, माजी नगरसेवक, प्रमुख आणि विश्‍वासू कार्यकर्त्यांच्या माध्यमातून कार्यक्षेत्रात राबता वाढवला आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून महाडीक गटानेही कारखान्याचे आजी-माजी संचालक, प्रमुख कार्यकर्ते यांच्यावर जबाबदारी सोपवली आहे. विरोधी आघाडीची धुरा स्वतः सतेज पाटील यांनी आपल्या हातात घेतली आहे तर सत्तारूढ गटासाठी खासदार धनंजय महाडीक, माजी आमदार अमल महाडीक यांच्यासह त्यांचे कट्टर कार्यकर्ते मैदानात उतरले आहे.
हातकणंगले व करवीर तालुक्यात कारखान्याचे सर्वाधिक मतदार आहेत. त्यामुळे या दोन तालुक्यांवर दोन्ही आघाड्यांनी लक्ष केंद्रीत केले आहे. गेल्या निवडणुकीत श्री. महाडीक यांना हातकणंगले तालुक्याने तारले, त्यामुळे या तालुक्‍यावर विरोधी आघाडीनेही लक्ष केंद्रीत केली आहे. त्यात दोनशेपेक्षा जास्त मतदार असलेली गांवे महत्त्वाची ठरणार असल्याने याच गावांवर दोन्ही गटांकडून मोठी ‘फिल्डींग’ लावण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी त्या गावांतील मुख्य नेते, कार्यकर्ते यांच्यावर जबाबदारी सोपवली आहे. जबाबदारी सोपवलेल्या या कार्यकर्त्यांवर लक्ष ठेवण्यासाठीही स्वतंत्र यंत्रणा आतापासूनच कार्यरत झाली आहे.
...............

२०० पेक्षा जास्त मतदार असलेली गावे

हातकणंगले तालुका - पुलाची शिरोली - ९६४, कुंभोज- ३१६, नरंदे-३२२, टोप, मौजे-४३०, रूकडी-२८३, भेंडवडे-२०६, लाटवडे-२२०, नागाव- २१७, पेठ वडगांव-२२०, वडगांव मौजे- २६३.

करवीर तालुका- कसबा बावडा - ९७५, करवीर शहर- ३४८, शिये-३५३, वडणगे-४७९, गडमुडशिंगी-४४३, वाशी-४३३, कांडगाव-३०७, चिखली- २०३, निगवे दुमाला- २७६, कळंबे तर्फ ठाणे-२३१.

राधानगरी तालुका- धामोड-३९४.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

IPL 2024: RCB चा आनंद गगनात मावेना! प्लेऑफमध्ये पोहचताच केला जोरदार जल्लोष, पाहा Video

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

SCROLL FOR NEXT