कोल्हापूर

पद्माराजे उद्यान

CD

‘प्रिन्सेस पद्माराजे
उद्यानातील विरंगुळा
केंद्र रद्द करावे’

कोल्हापूर, ता. १५ ः शिवाजी पेठेतील प्रिन्सेस पद्माराजे उद्यानामध्ये महापालिकेच्यावतीने बांधले जाणारे विरंगुळा केंद्र रद्द करावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी महापालिका प्रशासकांकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात म्हटले आहे, प्रिन्सेस पद्माराजे उद्यानाजवळ सावित्रीबाई फुले कन्याशाळा आहे. तसेच जवळ छोटी-छोटी घरे आहेत. त्यांना फिरण्यासाठी याच उद्यानाचा पर्याय आहे. नागरीकरणामुळे उद्यानाची लांबी, रुंदी कमी झाली आहे. तिथे ज्येष्ठ लोकांसाठी विरंगुळा केंद्र मंजूर केले आहे. परंतु, उद्यानात कोणतेही बांधकाम करण्यास स्थानिकांचा विरोध आहे. यापेक्षा पर्यावरणपूरक तसेच स्वच्छता बाबींकडे लक्ष देऊन दुरुस्ती व्हावी. विरंगुळा केंद्रास विरोध नाही, फक्त उद्यान सोडून इतर ठिकाणी त्याचे बांधकाम करावे. उद्यानात दारू व अवैध धंदे मोठ्या प्रमाणात चालत असून, विरंगुळा केंद्र बांधल्यास त्याचा वापर त्यासाठी होणार आहे. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागणार आहे. अजित हारूगले, सुनील मोरे, युवराज बचाटे, बळीराम माने, अजय इंगवले, संजय इंगवले, संजय भांदिगरे आदींनी निवेदन दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB १६,५०० कोटींना विकली... माल्ल्याला किती मिळाले; नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली!

Ram Navami: योगींनी बदललं आणखी एका गावाचं नाव, त्या काळरात्रीनंतर लेकी-बाळांना मिळालं हक्काचं घर, काय आहे रामनवमी कनेक्शन ?

Latest Marathi News Live Update : परिवहन विभागात बदली आणि वसुलीचे मोठे रॅकेट वडेट्टीवार यांचे आरोप

Land Acquisition Kolhapur Airport : कोल्हापूर -हुपरी राज्यमार्ग होणार बंद! विमानतळासाठी जमीन होणार संपादीत, ५० कोटींचा निधी मंजूर

Phaltan News: फलटणला नामांतरांचा ठराव मंजूर! पालिकेच्या पहिल्याच सभेत राजे- खासदार गटांत संघर्षाची ठिणगी; जोरदार शाब्दिक चकमक!

SCROLL FOR NEXT