कोल्हापूर

पंचाल सोनार समाज निदर्शने

CD

89891
कोल्हापूर : सोनार समाजातर्फे दसरा चौकात एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करताना उपस्थित समाजबांधव.
(नितीन जाधव : सकाळ छायाचित्रसेवा)


सोनार समाजासाठी संशोधन,
प्रशिक्षण संस्था निर्माण करा
---
लाक्षणिक उपोषणाद्वारे केली मागणी
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १८ : सोनार कारागीर आणि सोनार समाजातील कलावंतांसाठी बार्टी, महाज्योती, सारथीच्या धर्तीवर स्वतंत्र संशोधन आणि प्रशिक्षण संस्था निर्माण करावी, यासह अन्य मागण्यांसाठी आज सोनार समाजातर्फे एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले. दसरा चौकात दिवसभर हे शांततामय मार्गाने लाक्षणिक उपोषण झाले. ‘उठ सोनारा जागा हो, एकतेचा धागा हो’ अशा घोषणा देण्यात आल्या.
पंचाल सोनार समाजाचे अध्यक्ष अनिल पोतदार-हुपरीकर म्हणाले, की सध्या नवीन कायदे अमलात आणून सोनार कला संपवली जात आहे. हा आमच्यावर झालेला अन्याय आहे. १९६३ पासून आजपर्यंत आम्ही सोनार समाजासाठी महामंडळ निर्माण करावे, अशी मागणी करीत आहोत. अल्प समाज असलेल्या सोनारांना आर्थिक सहाय्य करून समाज जिवंत ठेवावा म्हणून आम्ही मागण्या मांडत आहोत; परंतु आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष झाले आहे. आम्हाला व्यवस्थित जगता यावे, ही कला जिवंत राहावी म्हणून आम्ही शासन दरबारी न्याय मागत आहोत. आम्हाला आर्थिक विकास महामंडळ निर्माण करून द्यावे.
अनिष पोतदार, अण्णा पोतदार, नचिकेत भुर्के, शिवानंद पेडणेकर, राजेंद्र पोतदार, पांडुरंग पोतदार, रवींद्र पोतदार, रामदास रेवणकर, नंदू वेलणकर, सुनील कडणे, रत्नाकर कारेकर, दिगंबर लोहार, शीतल पोतदार, केतन पोतदार, ज्ञानेश्‍वर पोतदार, सुरेश धर्माधिकारी, सुदर्शन पोतदार, गीतांजली पेडणेकर, गुरुनाथ पेडणेकर, संजय चोडणकर आदी उपस्थित होते.
---------
चौकट
प्रमुख मागण्या अशा ः
- आर्थिक विकास महामंडळ स्थापन करून त्या अंतर्गत बिनव्याजी आणि विनातारण पाच लाख ते एक कोटींपर्यंत कर्जपुरवठा व्हावा
- हुपरी चांदी कलानगरीचे जनक वामन कृष्णाजी पोतदार (हुपरीकर) यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार द्यावा
- कायद्यात सुधारणा करणे, सुवर्ण बांधवांचा त्रास कमी करण्यासाठी उच्चस्तरीय समिती निर्माण करावी
- कलावंत मानधन योजनेच्या धर्तीवर सोनार समाज कारागीर दरमहा मानधन योजना सुरू करावी
- मुंबई नगरीचे जनक नाना शंकरशेट यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार द्यावा
- वामन कृष्णाजी पोतदार (हुपरीकर) यांच्या नावे महामंडळ निर्माण करावे
- आय.पी.सी. कलम ४११/४१२ मध्ये सुधारणा करावी
- ओ.बी.सी. अंतर्गत स्वतंत्र पाच टक्के आरक्षण द्यावे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

IPL 2024: RCB चा आनंद गगनात मावेना! प्लेऑफमध्ये पोहचताच केला जोरदार जल्लोष, पाहा Video

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

SCROLL FOR NEXT