कोल्हापूर

शिवराजच्या कॅम्पस बझारला प्रतिसाद

CD

gad217.jpg
90528
गडहिंग्लज : शिवराज विद्या संकुल आणि महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण शिक्षा परिषदेतर्फे झालेल्या कॅम्पस बझारला दिलेल्या भेटीप्रसंगी प्रा. किसनराव कुराडे, अक्षय घोरपडे, वैष्णवी भालवणीकर आदी.
-----------------------------
शिवराजच्या कॅम्पस बझारला प्रतिसाद
कोल्हापुरी चपला, आर्टीफिशेल ज्वेलरी, पुस्तके आदींचे स्टॉल
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. २६ : येथील शिवराज विद्या संकुल आणि महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण शिक्षा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कॅम्पस बझारला विद्यार्थ्यांचा प्रतिसाद मिळाला. कोल्हापुरी चपला, आर्टीफिशेल ज्वेलरी, पुस्तके आदीसह खाद्यपदार्थांचे स्टॉल उभारले होते. उद्‍घाटन कार्यक्रमाला ग्रिनिती फार्मिंग सोल्यूशनचे सीईओ अक्षय घोरपडे, शिक्षा परिषदेचे समन्वयक विकास अवघडे यांची प्रमुख उपस्थिती होती. शिवराजचे अध्यक्ष प्रा. किसनराव कुराडे अध्यक्षस्थानी होते.
श्री. घोरपडे यांनी सध्या शेतीमध्ये आमुलाग्र बदल होत आहेत. या बदलला आता योग्यवेळी बझार उपलब्ध होणे काळाची गरज आहे. यातून विद्यार्थ्यांना उद्योजक म्हणून घडण्याची संधी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. श्री. अवघडे यांनी विद्यार्थ्यांमधील कार्यकुशलता वाढविण्यासाठी हा उपक्रम दिशादर्शक ठरेल असा विश्वास व्यक्त केला. प्रा. कुराडे, प्राचार्य डॉ. एस. एम. कदम, नेहरू युवा केंद्राच्या समन्वय वैष्णवी भालवणीकर यांची भाषणे झाली.
कलाशिक्षक रमण लोहार, शिवराजचे उपाध्यक्ष अॅड. दिग्विजय कुराडे, प्रा. बिना कुराडे, प्रा. पौर्णिमा कुराडे, डॉ. ए. जी. हरदारे, डॉ. आर. पी. हेंडगे, प्रा. दिपिका खांडेकर-पंडीत, प्रा. एम. आर. दंडगे, प्रा. श्रुती पाटील, प्रा. रेवती राजाराम, प्रा. तेजस्विनी शिंदे, सविता निकम, अक्षय पाटील आदी उपस्थित होते. समन्वयक डॉ. श्रद्धा पाटील यांनी प्रास्ताविकात बझारच्या आयोजनामागील हेतू स्पष्ट केला. प्रा. नाझिया बोजगर यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Telangana CM Revanth Reddy : तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना दिल्ली पोलिसांचं समन्स; अमित शाहांच्या व्हिडीओचं प्रकरण

Sairat Complete 8 Years : मराठी सिनेमाला १०० कोटींचं स्वप्न दाखवणाऱ्या 'सैराट'ला ८ वर्षं पूर्ण; रिंकूची पोस्ट चर्चेत

Share Market Closing: शेअर बाजारात तुफान तेजी; सेन्सेक्स 900 अंकांच्या उसळीसह बंद, गुंतवणूकदार मालामाल

Latest Marathi News Live Update: कोणतेही काम करण्यापूर्वी मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीस्थानी जातो: PM Modi

Nashik News : मालेगावी भाजीपाल्याची आवक स्थिर! मे, जून महिन्यात उत्पादन घटण्याचा अंदाज

SCROLL FOR NEXT