कोल्हापूर

जुनी वाहने भंगारात, ‘फौंड्री’ उद्योग येणार जोमात

CD

जुनी वाहने भंगारात, ‘फौंड्री’ येणार जोमात
कोल्हापुरातील उद्योग क्षेत्राला मिळणार बळ; सरकारच्या निर्णयाचा होणार फायदा

संतोष मिठारी ः सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २४ ः केंद्र आणि राज्य सरकारने स्क्रॅप पॉलिसीअंतर्गत १५ वर्षे पूर्ण झालेली वाहने भंगारात काढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार देशातील सुमारे १ कोटी २ लाख जुनी वाहने भंगारात जातील. त्यामुळे ऑटोमोबाईल इंडस्ट्रीजला बूस्ट मिळणार आहे. या इंडस्ट्रीजला विविध स्वरूपातील वाहनांच्या सुट्या भागाच्या स्वरूपात कास्टिंग पुरविणाऱ्या कोल्हापूरच्या फौंड्री उद्योगातील कामाचा जोम वाढणार आहे.
जुन्या वाहनांच्या वापराने प्रदूषण वाढते. इंधन अधिक खर्च होते. ते टाळण्यासाठी केंद्र, राज्य सरकारने अशा जुन्या वाहनांसाठी स्क्रॅप पॉलिसी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. १५ वर्षे पूर्ण झालेली शासकीय वाहने भंगारामध्ये काढण्यासाठी राज्य सरकारने महाराष्ट्र स्क्रॅप ट्रेड कॉर्पोरेशन पोर्टल सुरू केले आहे. केंद्र सरकारने अर्थसंकल्पात त्यासाठी १५० कोटींच्या निधीची तरतूद केली आहे. साधारणतः १ कोटी २ लाख जुनी वाहने भंगारात निघाल्यानंतर तितक्याच नव्या वाहनांची गरज निर्माण होणार आहे. त्याने वाहन निर्मिती करणाऱ्या ऑटोमोबाईल इंडस्ट्रीजच्या कामाची गती वाढणार आहे. या इंडस्ट्रीजमधील विविध मोठ्या कंपन्यांना लागणाऱ्या दुचाकी, चारचाकी, माल वाहतूक ट्रक, प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या विविध सुट्या भागांचा पुरवठा कोल्हापुरातील फौंड्री उद्योगातून केला जातो. त्यामुळे वाहन निर्मितीचा वेग वाढल्याने आपोआपच या फौंड्री उद्योगातील कामाची गती वाढणार आहे.
....
कोट
स्क्रॅप पॉलिसीचा निश्‍चितपणे कोल्हापूरच्या फौंड्री उद्योगाला फायदा होणार आहे. ‘फौंड्री’वर अवलंबून असलेल्या मशिन शॉप, हीट ट्रीटमेंट उद्योगांचेही काम वाढणार आहे. जुनी वाहने भंगारात काढण्याचे नवे उद्योगही सुरू होतील.
-सचिन शिरगावकर, अध्यक्ष, आयआयएफ, कोल्हापूर.
.....
कोट
भंगारात निघालेल्या वाहनातून स्टील, कॉपर, ॲल्युमिनियम, रबर, प्लास्टिक यांचा पुर्नवापर करता येणार आहे. त्यामुळे फौंड्रीसाठी लागणाऱ्या काही कच्च्या मालाचे दर कमी होतील. स्क्रॅप पॉलिसीमुळे सुमारे १५ वर्षांनी कोल्हापूरच्या फौंड्री उद्योगाला बूस्ट मिळणार आहे.
-राजू पाटील, माजी अध्यक्ष, स्मॅक.
...
चौकट
‘जिल्ह्यात ३५० शासकीय वाहने होणार स्क्रॅप’
जिल्ह्यात सध्या १५ वर्षे पूर्ण केलेली ३५० इतकी शासकीय वाहने आहेत. ती स्क्रॅप करण्याची प्रक्रिया १ एप्रिलपासून शासनाच्या नियमानुसार सुरू होईल, असे सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी रोहित काटकर यांनी सांगितले.
.....
चौकट
‘कोल्हापुरातून ७० टक्के कास्टिंगचा पुरवठा’
ब्लॉक, हेड, पिस्टन, मॅनफोल्ड, वॉटरफोल्ड, लिवर आदी स्वरूपातील कास्ट आणि इतर अशा एकूण ७० टक्के कास्टिंगचा पुरवठा कोल्हापुरातील फौंड्री उद्योगातून देश-परदेशातील वाहन निर्मिती करणाऱ्या कंपन्या, उद्योगांना केला जातो. त्यामुळे केंद्र, राज्य सरकारने घेतलेल्या जुनी वाहने भंगारात काढण्याच्या निर्णयाचा उद्योग क्षेत्राला निश्‍चितपणे फायदा होणार असल्याचे गोशिमाचे माजी अध्यक्ष श्रीकांत पोतनीस यांनी सांगितले.
.....
चौकट
आकडे काय सांगतात?
-जिल्ह्यातील फौंड्रीची एकूण संख्या ः ४५०
-कास्टिंगचे वार्षिक उत्पादन ः ७ लाख ५० हजार टन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi : 'सामान्य नागरिकाच्या घराचं वीज बिल शून्यावर आणणं माझं ध्येय'; पंतप्रधान मोदींनी सांगितला फ्युचर प्लॅन

Latest Marathi News Live Update: राजन विचारे उमेदवारी अर्ज दाखल करायला निघाले; ठाकरेंची उपस्थिती

Mumbai News: महाराष्ट्र दिनानिमित्त दादरसह परिसरातील वाहतुकीत बदल, वाचा महत्वाची बातमी 

Viral Video: रायफल्सच्या धाकाने ताब्यात घेत जाळली कार, वाचा न्यायाधीशाच्या अपहरण आणि सुटकेचा थरार

Crime News: इन्स्टाग्रामवर यौवना अन् प्रत्यक्षात समोर आली दुसरीच बाई.. अपेक्षाभंगामुळे तरुणाने केली बेदम मारहाण

SCROLL FOR NEXT