कोल्हापूर

इचलकरंजी काँग्रेसचे शंखध्वनी आंदोलन

CD

फोटो फाईल - ich236
90991
इचलकरंजी ः काँग्रेसच्यावतीने भाजप सरकारविरोधात मलाबादे चौकात शंखध्वनी आंदोलन केले. (छायाचित्र ः अनंतसिंग)

इचलकरंजी काँग्रेसचे शंखध्वनी आंदोलन

इचलकरंजी, ता.२३ ः खासदार राहुल गांधी यांच्यावर विविध ठिकाणी खटले दाखल केले जात असल्याच्या निषेधार्थ शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने मलाबादे चौकात शंखध्वनी आंदोलन केले. यावेळी मोदी सरकारविरोधात तीव्र घोषणाबाजी करण्यात आली.
‘लोकशाही मोडीत काढून देशाला हुकूमशाहीकडे नेण्याचा प्रयत्न मोदी सरकार करत आहे. त्यामुळे सर्व घटनात्मक संस्थांवर मोदी सरकार दबाव आणून आपल्या राजकीय विरोधकांना संपवण्याचा प्रयत्न करत आहे. त्याचाच भाग म्हणजे आज राहुल गांधींना झालेली शिक्षा होय,’ अशी टीका प्रदेश काँग्रेसचे सचिव शशांक बावचकर यांनी यावेळी केली. माजी नगरसेवक राहुल खंजिरे यांचेही भाषण झाले. आंदोलनात बाबासाहेब कोतवाल, शशिकांत देसाई, युवराज शिंगाडे, अजित मिणेकर, समीर शिरगावे, अनिता बिडकर, रविराज पाटील, विलास खिलारे, रवी वासुदेव, तोसीफ लाटकर, सचिन साठे, शिवा चव्हाण, प्रवीण पाटील आदी सहभागी झाले.
...............

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Labour Day : 1 मे ला कामगार दिवस का म्हटले जाते? काय आहे यामागचा इतिहास? वाचा सविस्तर

2024 च्या वर्ल्डकपनंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली टी-२० मधून घेणार निवृत्ती- रिपोर्ट

शेतकऱ्यांच्या फायद्याची बातमी! पीक कर्जाच्या पुनर्गठनासाठी ऑगस्टपर्यंत मुदत; दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी सवलत, पण शेतकऱ्यांची संमती पुनर्गठन आवश्यक

Maharashtra Day 2024: महाराष्ट्र दिनानिमित्त द्या खास अंदाजात मराठमोळ्या शुभेच्छा

Latest Marathi News Live Update : राम सातपुतेंच्या प्रचारसभेसाठी योगी आदित्यनाथ यांची आज सोलापुरात सभा

SCROLL FOR NEXT