कोल्हापूर

दुंडगेत मातृ-पितृ वंदन कार्यक्रम

CD

gad269.jpg
91543
दुंडगे ः श्री स्वामी समर्थ भक्त मंडळाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात आई-वडिलांची पाद्यपूजा करताना मुले व मुली.
----------------------------------------------------
दुंडगेत मातृ-पितृ
वंदन कार्यक्रम
नूल, ता. २६ ः दुंडगे (ता. गडहिंग्लज) येथे स्वामी समर्थ भक्त मंडळ, परिश्रम विद्यालय व दीप इंग्लिश मीडियम स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने मातृ-पितृ वंदन कार्यक्रम झाला. दत्ता देशपांडे प्रमुख पाहुणे होते. सायंकाळी मंदिरस्थळी हा कार्यक्रम झाला. सकाळी महारुद्राभिषेक व धार्मिक विधी झाले.
दत्ता देशपांडे यांनी मार्गदर्शन केले. साठहून अधिक आई-वडील उपस्थित होते. त्यांच्या मुलांनी पाद्यपूजा करून आशीर्वाद घेतले. विठ्ठल चौगुले यांनी स्वागत केले. बसवराज हिरेमठ यांनी पाद्यपूजेचे पौरोहित्य केले. नंदिनी नाईक व वैष्णवी घबाडे या विद्यार्थिनीनी आई-वडिलांचे महत्त्व या विषयावर मनोगत व्यक्त केले. आप्पासाहेब गुरव, सुरेश देसाई, बसवराज मगदूम, टी. एम. दुंडगे, बाबूराव लोहार, कलया स्वामी आदी उपस्थित होते. दिनकर खवरे यांनी सूत्रसंचालन केले. महाप्रसाद वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: "मेहनत घेण्याची क्षमता आणि चिकाटी..."; शरद पवारांसाठी हेमंत ढोमेचं ट्वीट

Google Chrome Errors: गुगल क्रोम युजर्सना सरकारचा इशारा, नुकसान टाळण्यासाठी लगेचच करा 'हे' बदल

Home Loan: RBIने जाहीर केली गृहकर्जाची धक्कादायक आकडेवारी; गेल्या 2 वर्षात झाली 10 लाख कोटी रुपयांची वाढ

California Bridge : कुठेच न पोहोचणारा 11 बिलियन डॉलरचा पूल! कॅलिफोर्नियतला ब्रिज झाला चेष्टेचा विषय

Latest Marathi News Update : पुण्यात मेट्रोच्या प्रवाशांमध्ये वाढ, एप्रिलमध्ये दिवसाला सरासरी 80 हजार जणांचा प्रवास

SCROLL FOR NEXT