कोल्हापूर

कर्करोग कार्यशाळा

CD

91807
कोल्हापूर ः महापालिकेतर्फे घेण्यात आलेल्या कर्करोग माहिती शिबिराचे उद्‍घाटन करताना प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे, यावेळी महापालिकेचे अधिकारी व डॉक्टर.

कर्करोग शिबिरामध्ये
७७ महिलांची तपासणी
कोल्हापूर, ता. २७ : महानगरपालिकेतर्फे महिलांसाठी कर्करोग माहिती व मार्गदर्शन शिबिरामध्ये ७७ महिलांची तपासणी करण्यात आली. केशवराव भोसले नाट्यगृहात झालेल्या या शिबिराचे उद्‍घाटन प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांच्या हस्ते झाले.
शिबिरामध्ये ६५० महिलांनी सहभाग घेतला, ७७ महिलांमधील ५० महिलांची गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाची प्राथमिक तपासणी करण्यात आली. प्रशासक बलकवडे यांनी सावित्रीबाई फुले व श्री पंचगंगा रुग्णालयात कर्करोगाबाबतची प्राथमिक तपासणी करण्याकरीता प्रशासनाचे सहकार्य राहील, असे सांगितले. कर्करोगाबाबत जागृती, परिक्षण व लक्षणे, निदान व उपचार, समज व गैरसमजाबाबत डॉ.राधिका जोशी, डॉ. निरुपमा सखदेव, डॉ. रेश्मा पवार, डॉ. शर्वरी मिरगुंडे, डॉ.यशस्वीनी चौधरी यांनी माहिती दिली. जीवनशैलीमध्ये करायचे बदल, गर्भाशयाच्या मुखाचे व स्तनाच्या कर्करोगाचे वाढते प्रमाण याबाबतची लक्षणे, तपासणी व प्रतिबंधात्मक उपाय याबाबतही माहिती देण्यात आली. उपायुक्त रविकांत आडसूळ, आरोग्याधिकारी डॉ.रमेश जाधव यांच्या नियंत्रणाखाली शिबिर घेण्यात आले. प्रशासन वैद्यकीय अधिकारी डॉ. मंजुश्री रोहिदास यांनी प्रास्ताविक केले. सुवर्णा जाधव यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uma Ramanan: तामिळ चित्रपटसृष्टीचा आवाज हरपला, दिग्गज गायिकेचे निधन

Prajwal Revanna: 'सेक्स टेप' प्रकरणी प्रज्वल रेवण्णा यांच्याविरोधात ग्लोबल लूकआऊट नोटीस जारी

PM Narendra Modi : 'मोदींचे निधन झाले तर कोणी पंतप्रधानच होणार नाही का?' काँग्रेस आमदाराचे पुन्हा वादग्रस्त विधान

Mumbai Loksabha: कोण मारणार मुंबईत बाजी? ठाकरेंचा आत्मविश्वास 'सातवे आस्मान'पे, भाजप मात्र संभ्रमात

Latest Marathi News Live Update : व्होट बँकेच्या भीतीने काँग्रेसने राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला येणं टाळलं - अमित शाह

SCROLL FOR NEXT