कोल्हापूर

स्पीड ब्रेकर की  बॅक ब्रेकर

CD

(पूर्वार्ध)
91676
कोल्हापूर : गारगोटी हा राज्य महामार्ग आहे, पण पट्टे नसल्याने गतिरोधक दिसूनच येत नाहीत.


अशास्त्रीय गतिरोधक मोडताहेत कंबरडे
निकषाचे पालन नाही; वाहनधारकांचा जीव मुठीत घेवून प्रवास
मोहन मेस्त्री : सकाळ वृत्तसेवा  
कोल्हापूर, ता. २७ : स्थानिक लोकप्रतिनिधी आणि नागरिकांच्या मागणीनुसार अनेक रस्त्यावर गतिरोधक बसवले जातात. मात्र, या गतिरोधकांवर काळे पांढरे पट्टे नसल्यामुळे वाहनचालकांना त्याचा अंदाज येत नसल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे. गतिरोधकाची रुंदी आणि उंचीही प्रमाणित नसल्याने दुचाकीस्वारांचे हाल होत आहेत. खड्डे कमी म्हणून की काय रस्त्यावर अशास्त्रीय पध्दतीने केलेल्या गतिरोधकांमुळे वाहनधारकांचे कंबरडे मोडत आहे. त्यामुळे उच्च न्यायालयाने गतिरोधकांसाठी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन व्हावे, अशी मागणी होवू लागली आहे.
शहरातील रस्ते आणि खड्डे याचे समीकरण जगजाहीर आहे. खड्डे नसलेला रस्ता.. आणि गतिरोधक नसलेला रस्ताही दाखवता येणार नाही. शहरातील ९० टक्के गतिरोधक ‘आयआरसी’च्या (इंडियन रोड कॉँग्रेस) नियमांचा भंग केलेले आहेत. शहराचे मुख्य रस्ते सुमारे ५६ किलोमीटरचे, तर अंतर्गत रस्त्यांचे जाळे ११०० किलोमीटरचे आहेत. अंतर्गत रस्त्यांसह शहरात हजार बाराशेहून अधिक गतिरोधक असावेत. मुख्य रस्त्याला गतिरोधक असू नयेत, असा नियम असूनही एकट्या रंकाळा तलाव ते पुईखडी नाका या रस्त्यावर २७ गतिरोधक आहेत. त्यापैकी एकाही ठिकाणी पांढरे पट्टे किंवा सूचना फलक नाही. रंकाळा ते फुलेवाडी नाका रस्त्यावरील गतिरोधक लहान चारचाकी मोटारीचा तळभाग टेकणारीच आहे. रिंगरोडवरचे गतिरोधक विस्कटून खड्डेयुक्त डोंगरच झाले आहेत. 
कोल्हापूर - गारगोटी हा स्वामी विवेकानंद महामार्गावर विविध प्रकारचे गतिरोधक आहेत. कळंबा जेलसमोरील दोन मोठे गतिरोधकच मानकाप्रमाणे असावेत. परंतु त्या शेजारीच परत सिंगल रबरी गतिरोधक करून वाहनधारकांना पाठीला दणके बसण्याची सोय केली आहे. रबरी गतिरोधक तुटून लोखंडी नट वाहनांचे टायर खराब करतात. कळंबा जेलच्या पिछाडीहून रिंगरोडकडे जाणारा रस्ता अक्षरशः खड्ड्यात गेला असतानाही चढ रस्त्याला गतिरोधक केल्यामुळे वाहनधारकांची परीक्षाच असते.
----------------
शासकीय निकष असे
- मुख्य रस्त्यावरील गतिरोधकांची रुंदी ३.७ मीटर म्हणजेच १२ ते १४ फूट रुंद असलेल्या गतिरोधकाची उंची ६ ते ८ इंच असावी
- गतिरोधक ‘आयआरसी‘नुसार निमुळते गोलाकार असायला हवेत. जेणेकरून वाहनांना २५ कि.मी.च्या गतीने पार करता यावेत
- गतिरोधकांच्या मागे किमान ४० फुटावर गतिरोधकांची सूचना देणारा ठळक फलक असावा
- गतिरोधकाशेजारी ५० टक्के अपघात झाले असल्याचा अभ्यास निष्कर्ष एप्रिल २०१९ मध्ये मुंबईच्या मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी काढला आहे
-------------
कायद्यानुसार कोठेही गतिरोधक नाहीत. जोड रस्त्यांना करण्याऐवजी मुख्य रस्त्यांना गतिरोधक केले आहेत. सूचना फलक आणि पट्टे नसल्याने पाठ दुखीचा त्रास सुरु झाले आहेत. वाहन नुकसानीला आणि अपघातांना जबाबदार कोण हे प्रशासनाने सांगावे.
-विजय घाटगे, नागरिक

................2

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Video : नरेंद्र मोदींनी काढली बाळासाहेब ठाकरेंची आठवण; म्हणाले, डीएमकेचे लोक सनातन धर्माला डेंग्यू म्हणत आहेत...

IPL 2024 DC vs MI Live Score : मुकेश कुमारने टीम डेविडचा अडथळा केला दूर; मुंबईचा 6 फलंदाज आऊट

PM Modi Kolhapur Rally: पंतप्रधान मोदींच्या सभेला संभाजी भिडेंची हजेरी; मोदींचं कोल्हापुरकरांना पुन्हा सत्तेत आणण्याचं केलं आवाहन

Tristan Stubbs DC vs MI : 4,4,6,4,4,4 एकाच षटकात होत्याचं नव्हतं झालं! स्टब्सच्या तडाख्यात वूडची शकलं

Latest Marathi News Live Update : पाच वर्षात पाच पंतप्रधान करण्याचा इंडिया आघाडीचा प्लॅन- मोदी

SCROLL FOR NEXT