कोल्हापूर

केडीसी बँकेत भाजपचे आंदोलन

CD

91850

केडीसीसी बँकेच्या शिवाजी पेठ
शाखेत भाजपचे धरणे आंदोलन

कोल्हापूर, ता. २७ : निवृत्ती चौकातील केडीसीसी बँकेमधील कर्मचारी पेन्शनधारक वयोवृद्ध नागरिकांना अपमानकारक वागणूक देत असल्याबद्दल तसेच बँकेतील सुविधांचा लाभ न देत असल्याबद्दल अनेक तक्रारी भाजपकडे आल्या होत्या. त्याची दखल घेत आज जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने केडीसीसी बँकेच्या शिवाजी पेठ शाखेमध्ये जाऊन उद्धट कर्मचारी, अधिकाऱ्यांना धारेवर धरले.
बँकेतील कर्मचाऱ्यां विरोधात घोषणाबाजी केली. वयोवृद्ध पेन्शनधारकांनी आपल्या तक्रारींचा पाढा वाचला. शाखा अधिकारी संजय कुऱ्हाडे यांनी चूक लक्षात आल्यानंतर तोंडी कारवाई करण्याचे आश्वासन दिले. जोपर्यंत अधिकाऱ्यांचे निलंबन होत नाही, तोपर्यंत आम्ही येथून हलणार नाही अशी भूमिका चिकोडे यांनी घेतली.
सर्व पेन्शन धारकांच्यासोबत त्यांनी शाखाअधिकाऱ्यांच्या केबिन बाहेर धरणे आंदोलन सुरु केले. श्री. वरुटे, श्री. भोसले यांनी या ठिकाणी येऊन शिष्टमंडळाची भेट घेतली. सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवायचे सोडून लेखी मागणी द्या, असा पवित्रा चिकोडे यांनी घेतला. जोपर्यंत जनरल मॅनेजर माने बँकेमध्ये येत नाहीत तोपर्यंत येथून जाणार नाही असा पवित्रा घेतला. जिल्हा सरचिटणीस दिलीप मेत्राणी, शिवाजी पेठ मंडळ अध्यक्ष गिरीश साळुंखे, महिला जिल्हाध्यक्ष गायत्री राऊत, भाजपा ज्येष्ठ नागरिक आघाडीचे अशोक लोहार, संतोष माळी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Rally Pune: "एका अतृप्त आत्म्यानं महाराष्ट्रासह देशाला अस्थिरतेत लोटलं"; PM मोदींकडून नाव न घेता शरद पवारांवर घणाघाती टीका

Modi Rally Pune: "तुम्ही लवकरच देशातील पहिल्या बुलेट ट्रेनमधून प्रवास कराल"; PM मोदींनी पुणेकरांना दिली गॅरंटी

Latest Marathi News Live Update : पुण्यातून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काँग्रेसवर निशाणा

Inheritance Tax: "निझामाच्या काळातही हे झालं नाही, आता लोकशाही..."; खर्गेंचं 'वारसा कर'च्या आरोपांना उत्तर

Aamir Khan : आणि 'महाराष्ट्र बंद' ने पालटलं आमिरचं नशीब

SCROLL FOR NEXT