कोल्हापूर

सतेज पाटील वाढदिवस

CD

सतेज पाटील यांचा वाढदिवस विविध
उपक्रमांनी साजरा करण्याचा निर्धार

कोल्हापूर, ता. २८ ः आमदार सतेज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्याचा निर्धार काँग्रेस कार्यकर्त्यांच्या बैठकीत व्यक्त झाला.
महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश सरचिटणीस गुलाबराब घोरपडे यांनी आमदार सतेज पाटील यांच्या कामाची माहिती राज्यभरात पोहोचवूया, अशी सूचना मांडली. आमदार जयंत आसगावकर यांनी वह्यांचा स्वरूपात शुभेच्छा हा अभिनव उपक्रम यंदाही राबवण्याची सूचना मांडली. कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण
यांनी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी ५१ टक्के सवलतीच्या दरात शेती अवजारे देण्यात येणार असल्याचे सांगितले.
सरकारी दवाखान्यासाठी औषधे, खो खो स्पर्धा, राज्यस्तरीय हॉकी स्पर्धा, रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर, वृक्षारोपण, कुस्ती स्पर्धा, अनाथाश्रम व वृद्धाश्रमामध्ये औषधे, शैक्षणिक साहित्य वाटप, शिरोली ते कसबा बावडा उत्सव रॅली, रुग्णांना ब्लॅंकेट वाटप, महिलांसाठी कॅन्सरमुक्त जागृती शिबिर, पाच हजार बांधकाम कामगार नोंदणी व साहित्य वाटप, कुष्ठरोगी लोकांना साहित्य वाटप, ग्रामदैवतांना अभिषेक, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, गरजू मुलांना स्कूल बॅग व गणवेश वाटप, सरकारी दवाखान्यातील डॉक्टर व कर्मचारी यांचा सत्कार आदी स्पर्धा व कार्यक्रमांबाबत बैठकीत चर्चा झाली.
‘गोकुळ''चे अध्यक्ष विश्वास पाटील, संचालक बाबासाहेब चौगले, बयाजी शेळके, प्रकाश पाटील, शशिकांत पाटील- चुयेकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बजरंग पाटील, माजी आमदार गोपाळराव पाटील, युवराज गवळी, डॉ. महादेव नरके, विद्याधर गुरबे, भरत रसाळे, सरलाताई पाटील, उदय पोवार आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: अस्वस्थ आत्म्यापासून सुटका करुन घ्या म्हणणाऱ्या PM मोदींना शरद पवारांचं प्रत्युत्तर; म्हणाले, हे खरं आहे पण...

Latest Marathi News Live Update : काँग्रेस जनतेची संपत्ती, त्यांच्या व्होटबँकेला वाटणार, मोदींचा आरोप

PM Modi in Dharashiv: अमेरिकेत व्हाईट हाऊसमध्ये जेवणाच्या टेबलवर होतं 'सूपरफूड'; मोदींनी सांगितला किस्सा

T20 WC 24 South Africa Squad : दक्षिण आफ्रिकेने टी-20 वर्ल्ड कपसाठी संघाची केली घोषणा! 2 अनकॅप्ड खेळाडूंची ताफ्यात एन्ट्री

Indian Navy: "कोणत्याही आव्हानासाठी नौदल कायम सज्ज," पदभार स्वीकारताच नवे नौदल प्रमुख गरजले

SCROLL FOR NEXT