कोल्हापूर

सुसज्ज पशुवैद्यकीय दवाखाना दिवास्वप्नच

CD

सुसज्ज पशुवैद्यकीय दवाखाना दिवास्वप्नच
‘़़पशुसंवर्धन’कडून जागेची मागणी; मनपावर प्रशासकामुळे ठरावाची प्रतीक्षा
संदीप जगताप : सकाळ वृत्तसेवा

इचलकरंजी, ता. २९ : इचलकरंजी पशुवैद्यकीय दवाखाच्या नवीन इमारतीसाठी मागणी केलेल्या जागेचा प्रस्ताव ठरावाच्या विळख्यात सापडला आहे. त्यामुळे सुसज्ज सरकारी पशुवैद्यकीय दवाखाना दिवास्वप्नच ठरत आहे.
पशुसंवर्धन विभागाने ऑक्टोबर २०२१ मध्ये प्रांत कार्यालयाकडे शहरातील शासनाच्या नावे असलेल्या जागेची मागणी केली होती. प्रांत कार्यालयाकडून महापालिकेचा ठराव असणे आवश्यक असल्याचा निर्वाळा दिला. मात्र महापालिकेवर प्रशासक असल्याने ठरावासाठी पशुसंवर्धन विभागास प्रतीक्षा करावी लागत आहे.
इचलकरंजी शहरात असलेला सरकारी पशुवैद्यकीय दवाखाना हा श्रेणी एकचा आहे. २००४ पासून हा दवाखाना महापालिकेच्या मालकीच्या एका गाळ्यामध्ये भाडे तत्वावर सुरू आहे. ही जागा अपुरी पडत असल्याने पशुसंवर्धन विभागाने शासनाकडे जागेची मागणी केली होती. त्यानुसार इचलकरंजी महानगरपालिकेच्या क्षेत्रातील महाराष्ट्र शासनाच्या नावे असलेल्या तीन जागेचा पर्याय दिला होता. त्यामध्ये शहापूर येथील औद्योगिक क्षेत्रातील जागा शहराबाहेर असून जनावरांना घेवून येण्यास त्रास होणार या शक्यतेने ती जागा नाकारण्यात आली. काळा ओढा परिसरातील जागा पावसाळ्यात पुराच्या पाण्याखाली जात आल्याने तीही रिजेक्ट केली. एकमेव शिल्लक असलेली गावभाग पोलिस स्टेशन समोरील गट क्रमांक १४४ मधील सुमारे ३० गुंठे जागा पशुसंवर्धन विभागाकडून निश्चित केली होती. त्यासंदर्भात प्रांत, तहसील व मंडल कार्यालयाकडे पत्रव्यवहारही केला होता. मात्र ही जागा ही महापालिका ठराव व स्थानिकांकडून होत असलेल्या विरोधामुळे सुसज्ज पशुवैद्यकीय दवाखान्याचे भवितव्य अंधारमय बनले आहे.
शहरातील शासकीय पशुवैद्यकीय दवाखाना आज अपुऱ्या जागेच्या समस्येशी झगडत आहे. पूर्वी येथे केवळ प्राथमिक उपचार होत असल्याने दवाखान्याचे काम चालत होते. मात्र सध्या येथे ऑपरेशनपासून सर्व उपचार सुरू करण्यात आल्याने ही जागा अपुरी पडत आहे. पशुसंवर्धन विभागाकडून या पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये अत्याधुनिक उपकरणे दिली आहेत. यामध्ये सोनोग्राफी, एक्सरे आदिसह अत्याधुनिक उपकरणांचा समावेश आहे. मात्र जागेअभावी ही उपकरणे वापराविना पडून आहेत. परिणामी पशुपालकांना नाईलाजस्तव खाजगी दवाखान्यांची पायरी चढावी लागते. जनावरांवर होणारी शस्त्रक्रिया ही खुल्या जागेमध्ये करावी लागत असल्याने संक्रमणाची शक्यता निर्माण होत आहे. अन्य उपचारावर मर्यादा येत आहे. त्यामुळे पशुवैद्यकीय दवाखान्याच्या जागे बाबत जलद मार्ग निघणे आवश्यक बनले आहे.
-------
सुसज्ज शुवैद्यकीय चिकित्सालय
प्रस्तावित प्रशासकीय पशुवैद्यकीय चिकित्सालय इमारत बांधण्यासाठी एक कोटी रुपये निधी असल्याचे सांगण्यात येते. या प्रस्तावीत दवाखान्यामध्ये ब्लड अॅनालायझर, बायोकेमिकल अॅनालायझर, सोनोग्राफी यूनिट, एक्सरे मशीन आदी उपकरणांसह अत्याधुनिक यंत्र सामग्रीने सुसज्ज असलेल्या पशुवैद्यकीय दवाखाना असणार आहे. त्यामुळे तालुक्यातील पशुवर रोगनिदान व उपचारास मदत होणार आहे.
-----------
इचलकरंजी शहरासाठी सुसज्ज शुवैद्यकीय चिकित्सालय आवश्यक आहे. या दवाखान्यासाठी कमीत कमी १५ गुंठे जागेची आवश्यकता आहे. सध्या पाहण्यात आलेली जागा सुमारे ३० गुंठे आहे. त्यामध्ये १५ गुंठे देण्यास स्थानिकांनी सहमती द्यावी.
-डॉ. आर. बी. जंगम, सहाय्यक आयुक्त, पशुसंवर्धन विभाग

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut : राज्यात महाविकास आघाडीला ३० ते ३५ जागांवर विजय मिळेल; संजय राऊत यांचा दावा

Pakistan Team coach : मोठी बातमी! भारताला World Cup मिळवून देणारा गुरू बनला पाकिस्तानचा कोच, PCB ने दिले अपडेट

'काँग्रेसने दोनदा बाबासाहेबांचा पराभव केला, प्रकाश आंबेडकरांना सोडून दिलं'; बावनकुळेंचा जोरदार प्रहार

Fact Check: उद्धव ठाकरेंना काँग्रेस कार्यकर्ते बोलू देत नसल्याचा दावा खोटा; प्रचार सभेतील अर्धवट व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Live Update : अभिनेता साहिल खानला दोन दिवसांची पोलीस कोठडी

SCROLL FOR NEXT