कोल्हापूर

सीपीआर बैठक

CD

सीपीआरमधील सफाई
कर्मचाऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

कोल्हापूर ,ता. ४ ः सीपीआरमधील स्वच्छतेचा ठेका एका खासगी कंपनीला मिळू नये यासाठी एका माजी ठेकेदाराने कोल्हापूर शहर सर्वपक्षीय असंघटित कामगार अन्याय निवारण समितीच्या आडून संबंधित कंपनीच्या बदनामीचे षडयंत्र सुरू केले आहे. त्याला काही कर्मचारी खतपाणी घालत आहेत. इतर सफाई कर्मचाऱ्यांना त्रास देत वेठीस धरत आहेत. संबंधित कंपनीची नाहक बदनामी सफाई कर्मचारी कदापि सहन करणार नाहीत, हा प्रकार थांबला नाही तर कृती समितीतील प्रमुखांच्या घरासमोर मुलाबाळांसह ठिय्या आंदोलन करू, असा इशारा सीपीआरमधील सफाई कर्मचाऱ्यांनी आज दिला.
सफाई कर्मचाऱ्यांची कामगार प्रतिनिधी मनीषा चव्हाण, अरुण कांबळे, अनिल माने यांच्या प्रमुख उपस्थितीत सीपीआरमध्ये बैठक झाली. त्यामध्ये सफाई कर्मचाऱ्यांनी संबंधित कंपनीच्या पाठीशी ठाम राहण्याचा निर्धार व्यक्त केला.
सीपीआरमध्ये २०१७ पासून संबंधित कंपनी आपल्या स्वच्छता कर्मचाऱ्यांसह चांगल्या पद्धतीने काम करते. मात्र यावर्षी ठेका देण्याचा मुद्दा पुढे आला असल्याने या कंपनीच्या विरोधात बदनामीचे षडयंत्र रचले आहे. कृती समितीने संबंधित कंपनीच्या काही कर्मचाऱ्यांना अमिष दाखवून आपल्याकडे घेतले. कंपनीविरोधात आंदोलन करण्यास भाग पाडले. संबंधित कंपनीला ठेका मिळू द्यायचा नाही यासाठी श्रमिक संघटनेसह कोल्हापूर शहर सर्वपक्षीय असंघटित कामगार अन्याय निवारण समितीचे प्रयत्न सुरू आहे, असेही कर्मचाऱ्यांनी बैठकीत सांगितले.
...


उद्या बैठक

सीपीआरमधील स्वच्छता कर्मचाऱ्यांचे नाव पुढे करून संबंधित कंपनीला टार्गेट करणाऱ्या कृती समितीला यापुढे जाब विचारण्याचा निर्धार स्वच्छता कर्मचाऱ्यांनी केला आहे. येत्या ६ एप्रिल रोजी कृती समितीची बैठक आहे. या बैठकीवेळी आम्ही सर्व स्वच्छता कर्मचारी या कृती समितीच्या प्रमुखांना घेराओ घालून जाब विचारणार आहोत, असे अनिल माने यांनी या बैठकीमध्ये सांगितले. यावेळी शंकर कांबळे, लता माळगे, पद्मा मुधाळे, रोहिणी कांबळे, नग्मा मकानदार, दिगंबर पाटील, सुजित सावंत आदी कर्मचारी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT