कोल्हापूर

इचलकरंजी परिसरातील संक्षिप्त बातम्या

CD

कुस्ती स्पर्धेत दि न्यू हायस्कूलचे यश
इचलकरंजी : येथील पी. बी. पाटील मळा येथे झालेल्या कुस्ती स्पर्धेत दि न्यू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थी-विद्यार्थीनींनी यश मिळविले. यामध्ये अनुराधा सुतार, समिक्षा भुईंबर, समृध्दी भुईंबर, मानसी सुतार, गायत्री गेजगे, देविका गेजगे, वैष्णवी यादव यांच्यासह अवधूत अवघडी, सुमित यादव यांचा समावेश आहे. त्यांना ढाल व प्रमाणपत्र देवून सन्मानित करण्यात आले. त्यांना मुख्याध्यापक एस. ए. पाटील, बी. ए. कोळी यांचे प्रोत्साहन, तर क्रीडा शिक्षक पी. बी. कोळी, एम. जी. आंबेडकर यांचे मार्गदर्शन लाभले.
------------
वक्तृत्व स्पर्धेत वसुंधरा कबनूरकर प्रथम
इचलकरंजी : गडमुडशिंगी (ता.करवीर) येथे वंचित बहुजन आघाडीतर्फे घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत वसुंधरा कबनूरकर (इयत्ता आठवी) हिने प्रथम क्रमांक पटकाविला. येथील दि न्यू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजची ती विद्यार्थीनी आहे. तसेच कोरोची येथे झालेल्या शिवव्याख्यानावेळी तिने केलेल्या भाषणाबद्दल प्रथमेश इंदूरकर यांच्याहस्ते रोख बक्षिस देवून सत्कार करण्यात आला. या यशाबद्दल मुख्याध्यापक एस. ए. पाटील यांनी तिचे अभिनंदन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Google Error : गुगल डाऊन! जगभरातील युजर्स त्रस्त; अमेरिकेतून 1400 तक्रारी

Yogi Adityanath : काँग्रेस सत्तेत आल्यास हिंदूंची विभागणी होईल - योगी आदित्यनाथ

IPL 2024, CSK vs PBKS: चेन्नईला पंजाबच्या गोलंदाजांनी रोखलं अन् फलंदाजांनी ठोकलं; ऋतुराजसेनेचा बालेकिल्ल्यात दुसरा पराभव

Loksabha election 2024 : जेडीयूचे माजी प्रदेशाध्यक्ष शशांक राव यांचा भाजपात प्रवेश; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

SCROLL FOR NEXT