कोल्हापूर

विवेकानंद महोत्सव

CD

96873
कोल्हापूर : विवेकानंद महोत्सवाच्या उद्‍घाटनप्रसंगी रोहित कोरगावे यांनी मार्गदर्शन केले. या वेळी प्राचार्य अभयकुमार साळुंखे व मान्यवर उपस्थित होते.


महोत्सवामुळे विद्यार्थ्यांना व्यासपीठ
रोहित कोरगावे; ‘विवेकानंद’मध्ये महोत्सवाचे उद्‍घाटन
कोल्हापूर, ता. १८ : ‘‘स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणे गरजेचे आहे. सध्याचा काळ कौशल्य विकासाचा असून अशा काळात विद्यार्थ्यांनी आपल्या व्यक्तिमत्वाला आकार देण्यासाठी स्पर्धेमध्ये सहभागी होणे महत्त्वाचे आहे. अशा काळात विवेकानंद कॉलेजने विद्यार्थ्यांच्या कर्तृत्वाला आकार देण्यासाठी, त्याच्या कलागुणांचा विकास होण्यासाठी विवेकानंद महोत्सवाचे केलेले आयोजन महत्वाचे आहे,’’ असे प्रतिपादन स्मार्टस ग्लोबल सर्व्हिसेसचे संचालक रोहित कोरगावे यांनी केले. ते विवेकानंद कॉलेज आयोजित विवेकानंद महोत्सवाच्या उद्‍घाटनात बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे होते.
प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांनी तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे सांगितले. प्रास्ताविक महोत्सवाच्या समन्वयक डॉ. श्रुती जोशी यांनी केले. महोत्सवांमध्ये फूड फेस्टिव्हलमध्ये वेगवेगळ्या पदार्थांचा खवय्यांनी मनसोक्त आस्वाद घेतला. दोन दिवस चालणाऱ्या या महोत्सवाच्या पहिल्या दिवशी अभिवाचन, स्टार्टअप, नाविन्यपूर्ण संशोधन, शॉर्ट फिल्म मेकिंग, रील ओ ऍड, एकपात्री या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धांमध्ये महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, केरळ राज्यातील बहुसंख्य महाविद्यालये सहभागी झाली होती. उदघाटन समारंभाचे सूत्रसंचालन प्रा. सुप्रिया पाटील यांनी केले. आभार डॉ. कविता तिवडे यांनी मानले. यावेळी प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार उपस्थित होते.
------------

स्पर्धा अभिवाचन विजेते
प्रथम : विवेकानंद कॉलेज
द्वितीय : महावीर कॉलेज
तृतीय : कॉमर्स कॉलेज
------------
स्टार्टअप स्पर्धा
प्रथम : अजिंक्य भोसले, योगेश चोपले, राजे रामराव महाविद्यालय, जत
द्वितीय : ऋतुजा पाटील, स्वरूपा पाटील, न्यू कॉलेज, कोल्हापूर
तृतीय : श्रीवर्धन शिंदे, विवेकानंद कॉलेज, कोल्हापूर
----------
नाविन्यपूर्ण संशोधन
प्रथम : वहिदा जमादार, विवेकानंद कॉलेज
द्वितीय : प्रेरणा सावंत, शिवाजी विद्यापीठ
तृतीय : स्टेला थॉमस, न्यू कॉलेज व श्रीरंगा श्रीकुमार, केरळा विद्यापीठ
-----------
शॉर्ट फिल्म मेकिंग
प्रथम : आर्टस् & कॉमर्स कॉलेज, नागठाणे,
द्वितीय : डी. आर. माने कॉलेज, कागल
तृतीय : विवेकानंद कॉलेज
...
रील ओ ऍड
प्रथम : सतेज राऊत, के. आय. टी. कॉलेज
द्वितीय : अजय माने, डी. आर. माने कॉलेज, कागल
तृतीय : गौरव रोकडे, विवेकानंद कॉलेज
...
एकपात्री
प्रथम : निहाल रुकडीकर, विवेकानंद कॉलेज
द्वितीय : पियुष जमादार, कॉमर्स कॉलेज
तृतीय : प्रांजल जाधव, वीरमाता जिजाबाई कॉलेज, मुंबई

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Country Cricket : भांडण बीसीसीआय अन् पीसीबीचं; तिकडं इंग्लंड क्रिकेट बोर्डाचे ह्रदयाचे ठोके का वाढले?

Manifesto : केवळ घोषणा, अंमलबजावणी नाही! जाहीरनाम्यांपासून ज्येष्ठ नागरिक दूरच असल्याची खंत

MPSC Exam : लोकसेवा आयोगाचं शुद्धीपत्रक, राज्यसेवा पूर्व परीक्षेची नवीन तारीख जाहीर

Vimannagar Fire : विमाननगर येथे व्यवसायिक इमारतीतील सहाव्या मजल्यावरील कार्यालयाला आग

SRH vs LSG Live Score : संथ खेळपट्टीवर लखनौ सुस्तावली; अर्धशतकासाठी उजाडलं 9 वं षटक

SCROLL FOR NEXT