कोल्हापूर

संयुक्त राजारामपुरीची जल्लोषी मिरवणूक

CD

97195
कोल्हापूर : शिव जयंतीनिमित्त राजारामपुरी संयुक्त शिवजयंती मंडळातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची मिरवणूक काढण्यात आली. (मोहन मेस्त्री : सकाळ छायाचित्रसेवा)

संयुक्त राजारामपुरीची जल्लोषी मिरवणूक
सर्व मंडळे एकवटली; छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची प्रतिष्ठापना
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १९ ः संयुक्त राजारामपूरी परिवाराच्या शिवजयंती उत्सवासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची प्रतिष्ठापना आज करण्यात आली. ढोल-ताशांचा निनाद, शिवकालीन युद्ध केलेची प्रात्यक्षिके आणि फटाक्यांची आतषबाजी अशा जल्लोषी वातावरणात निघालेल्या मिरवणुकीने महाराजांची मूर्ती मुख्य मंडपात आणण्यात आली. या वेळी राजारामपूरीमधील विविध पक्ष, सामाजिक कार्यकर्ते आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राजारामपूरीमधील सर्व तरुण मंडळे एकत्र येऊन शिवजयंती साजरी करतात. संयुक्त राजारामपूरी परिवारातर्फे हा उत्सव साजरा केला जातो. यंदा त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची सिंहासनारूढ मूर्ती आणली आहे. ही मूर्ती इथून पुढील सर्व शिवजंयती उत्सवांमध्ये बसवण्यात येईल. या मूर्तीची भव्य मिरवणूक आज काढण्यात आली. जनता बझार चौकातून मिरवणुकीला सुरूवात झाली. येथे मूर्तीचे अनावरण करण्यात आले. मिरवणुकीच्या सुरुवातीला ध्वनीक्षेप लावला होता. त्यानंतर तोफेची प्रतिकृती होती. त्याच्या पाठीमागे शिवशाही मर्दानी आखाड्याच्या मुला, मुलींनी शिवकालीन युद्ध कलेची प्रात्यक्षिके सादर केली. त्याच्यापोठापोठ करवीर गर्जना पथकाने ढोलताशाचा गजर केला. फटाक्यांची आतशबाजी आणि शिवभक्तांनी दिलेल्या घोषणा यामुळे सारे वातावरण शिवमय झाले होते. पुढील तीन दिवस संयुक्त राजारामपूरी यांच्यातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या वेळी माजी नगरसेवक अनिल कदम, नितीन पाटील, ॲड. बाबा इंदुलकर, कमलाकर जगदाळे, दुर्गेस लिंग्रस, जयराज निंबाळकर, श्रीकांत सावंत, अनुप पाटील यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT