कोल्हापूर

चेतना वर्धापनदिन

CD

97346
कोल्हापूर ः चेतना अपंगमती विकास संस्थेच्या वर्धापनदिनानिमित्त इंडिको रेमडीजतर्फे ३४ सीटर बस प्रदान करण्यात आली.

‘चेतना’च्या वर्धापनदिनानिमित्त
इंडोको रेमेडीजकडून बस प्रदान
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २० ः येथील चेतना अपंगपती विकास संस्था या बौद्धिक अक्षम मुलांच्या शिक्षण आणि पुनर्वसनाचे क्षेत्रात कार्य करणाऱ्या संस्थेचा ३७ वा वर्धापन दिन उत्साहात झाला. यानिमित्ताने मुंबईतील इंडोको रेमेडीजने संगोपन या सीएसआर उपक्रमांतर्गत संस्थेस एक ३४ आसनक्षमतेची स्कूल बस प्रदान करण्यात आली. यावेळी इंडोको रेमेडीजचे समीर दैनी, शेरॉन फर्नांडिस, पराग सूचक व पर्ल डिसुझा उपस्थित होते. विद्यार्थी, पालक व शिक्षक यांनी केक कापून वर्धापन दिन साजरा केला. नरेश बगरे यांनी अध्यक्षस्थानी होते.
कार्यकारी अध्यक्ष पवन खेबुडकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. ते म्हणाले, ‘‘संस्थेने ३७ वर्षांची वाटचाल केली. या मुलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात घेऊन येण्याचे जे कार्य उभे केले ते मुख्यतः शिक्षकांचे योगदान, पालकांचे सहकार्य व हितचिंतक आणि देणगीदार यांच्या पाठिंब्यामुळे शक्य झाले.’’ समीर दैनी म्हणाले, ‘‘इंडोको रेमिडिज अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत पुढे आली असून आज सहा हजार कर्मचारी इथे काम करत आहेत. दोन हजार कोटी ची उलाढाल असणाऱ्या या कंपनीने समाजाच्या अशा सर्व दुर्बल वंचितासाठी नेहमीच सहकार्याचा हात पुढे केला आहे.’’ संस्थेचे अध्यक्ष बगरे यांनी संस्थेस पुढे एक बहुउद्देशीय असे कम्युनिटी सेंटर उभे करणार असल्याचे सांगितले.
पाहुण्यांची ओळख उपाध्यक्ष डॉ. सुनील पाटील यांनी करून दिली. सीएसआर टीमतर्फे समीर दैनी व शेरॉन फर्नांडिस यांनी मनोगत व्यक्त केले. सचिन एकशिंगे यांनी सूत्रसंचालन केले. कृष्णात चौगले यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 Updates: देशभरात तिसऱ्या टप्प्यात 60.74 तर महाराष्ट्रात 53.90 टक्के मतदान

Explained: EVM जाळल्यावर, तोडफोड केल्यावर शिक्षा काय? निवडणूक आयोगाचे कडक कायदे जाणून घ्या...

ECI Directs X : भाजपची 'ती' आक्षेपार्ह पोस्ट तातडीनं हटवा! निवडणूक आयोगाचे ट्विटरला आदेश

Latest Marathi News Live Update : नांदेडमध्ये गोळीबार करत हल्लेखोर पैसे घेऊन पसार

Suryakumar Yadav Video: प्रेम हे! शतक करत मुंबईला जिंकवल्यानंतर सूर्याचा मैदानातून स्टँडमध्ये बसलेल्या पत्नीला व्हिडिओ कॉल

SCROLL FOR NEXT