कोल्हापूर

‘कोटा’तर्फे गडहिंग्लज, आजरा चंदगडला उद्या मोफत सेमीनार

CD

‘कोटा’तर्फे गडहिंग्लज, आजरा
चंदगडला उद्या मोफत सेमीनार
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. २१ : येथील शल्यचिकित्सक डॉ. नागेश पट्टणशेट्टी यांच्यातर्फे चालवण्यात येत असलेल्या कोटा अकॅडमी सेंटरतर्फे दहावी परीक्षा दिलेल्या व दहावीत प्रवेशित होणाऱ्‍या विद्यार्थी व त्यांच्या पालकांसाठी रविवारी (ता. २३) गडहिंग्लज, आजरा व चंदगड तालुक्यात मोफत सेमीनारचे आयोजन केले आहे. दहावीनंतर पुढे काय व नेमकं कसं या विषयावर हे सेमीनार होईल.
चंदगड तालुक्यातील पाटणे फाटा येथील व्ही. के. चव्हाण कॉलेजमध्ये सकाळी साडेनऊ, आजऱ्‍यातील श्रीमंत गंगामाई वाचन मंदिरात दुपारी दोन तर गडहिंग्लजला कडगाव रोडवरील वीज मंडळ मंगल कार्यालयात सायंकाळी साडेपाचला हे सेमीनार होणार आहे. इंटरनॅशनल एक्सलन्स अ‍ॅवार्ड विजेते डॉ. महेश खुस्पे (कराड) हे मार्गदर्शन करणार आहेत. मेडिकल, रिसर्च, डिफेन्स इंजिनिअरिंग क्षेत्रातील संधी या विषयावर मार्गदर्शन तर इंजिनिअरिंग क्षेत्रातील एरोनाटीकल्स, रोबोटीक, एव्हीएनिक्स, अ‍ॅस्ट्रोफिजीक्स व आर्टीफिशीयल इंटेलिजन्स या शाखांची माहिती ते देणार आहेत. मेडीकल क्षेत्रातील बदलत्या संधी व नीट, जेईई प्रवेश परीक्षांचे मार्गदर्शन होणार आहे. कोटाच्या येथील सेंटरमध्ये फिजीक्स, केमेस्ट्री, मॅथेमिटीक्स, बायोलॉजीसाठी कोटा (राजस्थान) येथील शिक्षकांकडून जेईई, सीईटी, आयआयटी, बिटस व व्हीआयटी, एम्ससारख्या प्रवेश परीक्षांचे शास्त्रशुद्ध मार्गदर्शन केले जात असल्याचे डॉ. पट्टणशेट्टी यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Best Saving Plan : दिवसाला फक्त २५० रुपये सेव्हिंग करा अन् २४ लाख रुपये मिळवा; लखपती बनवणारी सरकारी स्कीम

MI vs KKR IPL 2024 : IPL मधून मुंबई इंडियन्सचा पत्ता कट होणे टीम इंडियासाठी ठरणार गोड बातमी? जाणून घ्या कारण

Pension Department: पेन्शनधारकांना मोदी सरकारची मोठी भेट! नवीन ऑनलाइन पोर्टल केले लाँच; मिळणार 'या' सुविधा

Latest Marathi News Live Update: राहुल गांधींना 'शेहजादा' म्हणणाऱ्या पंतप्रधान मोदींवर प्रियंका गांधींचा हल्लाबोल

Indian Navy : अरबी समुद्रात पुन्हा भारतीय नौदलाची हवा, 20 पाकिस्तानींसाठी ठरले देवदूत

SCROLL FOR NEXT