कोल्हापूर

जलस्‍त्रोतांचे होणार जिओ ट्रॅगिंग

CD

जिल्‍हा परिषद ... लोगो
...

जलस्‍त्रोतांचे होणार जिओ टॅगिंग

एका क्‍लिकवर मिळणार माहितीः स्‍त्रोताची आदलबदल करण्याचे प्रकार टाळण्यास होणार मदत

सदानंद पाटील, सकाळ वृत्तसेवा

कोल्‍हापूर, ता.२२: जिल्‍ह्यात जल जीवन मिशन योजनेतून १ हजार २३५ पाणी योजना घेण्यात आल्या आहेत. काही योजना या बोअरवेल, तलाव, नदीसह झऱ्या‍वरुन घेण्यात आल्या आहेत. ही सर्व कागदोपत्री माहिती उपलब्‍ध आहे. आता जिओ टॅगिंगच्या माध्यमातून ही माहिती मोबाईलवर केव्‍हाही, कुठेही पाहता येणार आहे. या उपक्रमामुळे नागरिकांना तसेच विभागालाही स्‍त्रोताचा अंदाज येणार आहेच. मात्र भविष्यात याचे बळकटीकरण करायचे असेल किंवा काही दुरुस्‍ती करायची असेल, स्‍त्रोताची तपासणी करायची असेल तर त्यासाठी याचा उपयोग होणार आहे. महत्‍वाचे म्‍हणजे स्‍त्रोताची आदलबदल करण्याचे प्रकार टाळण्यास याची मदत होणार आहे.
जिल्‍ह्यात जल जीवन मिशन योजनेतून पाणी योजनांची कामे सुरु आहेत. गावातील प्रत्येक कुटुंबाला नळाने पुरेसे व स्‍वच्‍छ पाणी देण्याच्या उद्देशाने ही योजना घेण्यात आली आहे. पहिल्यांदाच एकाचवेळी सर्वच्या सर्व गावांमध्ये पाणी योजना घेण्यात आल्या आहेत. यामध्ये नवीन पाणी योजनांसह जुन्या पाणी योजनांचे बळकटीकरण, स्‍त्रोत बळकटीकरणाची कामे घेण्यात आली आहेत. या योजनांमधील बहुतांश योजना या नदीवरुन करण्यात येत आहेत. तर डोंगरी भागातील जसे की चंदगड, शाहूवाडी, भुदरगड,राधानगरी येथे झऱ्या‍वरील योजनांची संख्या लक्षणीय आहे.

गावासाठी पाण्याचे जे स्‍त्रोत आहेत त्यांची एकत्रित माहिती उपलब्‍ध नव्‍हती. किंवा स्‍त्रोताची स्‍थिती काय आहे, हे पाणी पुरवठा कर्मचाऱ्या‍शिवाय अन्य कोणाला माहित नव्‍हते. आता मात्र स्‍त्रोताचे जिओ टॅगिंग करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने, त्याची माहिती सर्वांना उपलब्‍ध होणार आहे. स्‍त्रोताचा परिसर, बांधकामाची स्‍थिती, पाण्याची स्‍थिती या सर्वांची माहिती उपलब्‍ध होणार आहे. भविष्यात या स्‍त्रोताच्या दुरुस्‍तीचा प्रश्‍‍न आला तर पूर्वीची स्‍थिती माहित असणे आवश्यक आहे. त्यासाठी जिओ टॅगिंग महत्‍वाचे आहे. तसेच एकाचेवळी स्‍त्रोतांचे विश्‍‍लेषणही करता येणार आहे.

या जलस्‍त्रोतांचे जिओ टॅगिंग करण्याची जबाबदारी संबंधित तालुक्याचे शाखा अभियंता, उपअभियंता यांच्यावर सोपवण्यात आली आहे. पुढील पंधरा दिवसात हे जिओ टॅगिंग पूर्ण केले जाणार आहे. महत्‍वाचे म्‍हणजे बऱ्या‍चवेळा पाण्याचा स्‍त्रोत एक व दुरुस्‍तीसाठी दुसराच स्‍त्रोत दाखवून निधी पळवण्याचा अनेक वेळा प्रकार घडतो. त्याला आळा बसणार असल्याचे पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक धोंगे यांनी सांगितले.

....

‘कोणत्या गावाला कोणत्या स्‍त्रोतापासून पाणीपुरवठा केला जातो, याची माहिती उपलब्‍ध होत नाही. ही माहिती एका क्‍लिकवर घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे भविष्यात योजना घेत असताना पुर्वीची माहिती समजण्यासाठी तसेच स्‍त्रोताची देखभाल, दुरुस्‍ती करण्यासाठीही या माहितीचा उपयोग होणार आहे. पंधरा दिवसात ही सर्व माहिती उपलब्‍ध करण्यात येईल. ही माहिती कोणीही, कुठेही आणि कधीही पाहू शकेल.

संजयसिंह चव्‍हाण, मुख्य कार्यकारी अधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: लग्नासाठी सोनं घेणार? आधी ही बातमी वाचा! 20 हजारांनी महागलं सोनं; सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर? पाहा ताजा भाव

Wath A Ball! पृथ्वी शॉचा संघर्ष सुरूच... डोळ्यासमोर चेंडू फिरला अन् यष्टिंवर आदळला, हा पठ्ठ्या नुसता पाहत राहिला Video Viral

रितेश देशमुखवर चक्क उधारी! सोशल मीडियावर पोस्ट करत म्हणाला...'मला त्याची उधारी चुकवायची, प्लीज मदत करा'

Sagar Mali Bodybuilder Death : जगाला ताकद दाखवली पण..., आंतरराष्ट्रीय बॉडी बिल्डर सागर माळी यांचे निधन, मृत्यूचे धक्कादायक कारण समोर

Marathi News Live Updates : ज्येष्ठ व्याकरणतज्ज्ञ प्रा. यास्मिन शेख यांचे वयाच्या १०१ व्या वर्षी निधन

SCROLL FOR NEXT