कोल्हापूर

संयुक्त राजरामपुरी चा शिवजयंतीउत्सव थाटात

CD

फोटो
...
‘संयुक्त राजारामपुरी’चा जयंती उत्सव थाटात 


कोल्हापूर, ता. २२ : ‘संयुक्त राजारामपुरी’च्या वतीने शिवजयंती उत्सव थाटात साजरा झाला. छत्रपती शिवाजी महाराज, महाराणी ताराराणी, राजमाता जिजाऊ, छत्रपती संभाजी महाराज यांच्या वेशभूषा केलेल्या कलाकारांसह मावळ्यांनी मिरवणुकीत जिवंतपणा आणला. तत्पूर्वी श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या हस्ते मिरवणुकीचे उद्‌घाटन झाले. यावेळी मालोजीराजे, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, आमदार जयश्री जाधव, पी. एन. पाटील, ऋतुराज पाटील, संजय पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. 
 राजारामपुरी परिसरातील १०० हून अधिक मंडळांनी एकत्रित येऊन साजरी केलेली शिवजयंती विशेष ठरली. पारंपरिक वाद्यांसह आकर्षक विद्युत रोषणाईने सजलेली मिरवणूक राजारामपुरी परिसरातून निघाली. ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमला. आबालवृद्ध सहभागी झालेल्या या मिरवणुकीमध्ये विविध वेशभूषा करून सहभागी झालेल्या कलाकारांनी इतिहास जिवंत केला. चालत्या ट्रॉलीवरील शाहिस्तेखान वधाचा देखावा मुख्य आकर्षण ठरला. मिरवणुकीमध्ये संजय जाधव, अध्यक्ष अनुप पाटील, संग्राम निंबाळकर, विघ्नेश आरते, किशोर खानविलकर आदी सहभागी झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fifa World Cup 2026 : तोंडावर हात ठेवून बोलला, रेफरीने करेक्ट 'कार्यक्रम' केला; Miguel Almiron सोबत विचित्र घडलं... Video Viral

Telegram Ban नंतर ॲक्सेससाठी लोकांनी शोधल्या नव्या ट्रिक्स; रॉकेटच्या वेगाने वाढले VPN डाऊनलोड, 'या' पद्धतीने सुरुय गैरवापर

Latest Marathi Live Updates: SIR कडे दुर्लक्ष करू नका- राज ठाकरे

Jalgaon: सोन्यात साडेचार, तर चांदीत १३ हजारांची घसरण; आयातीवरील शुल्क, युद्धबंद झाल्याचा परिणाम

FDA Action: तुकाराम मुंढे अ‍ॅक्शन मोडवर, राज्यभरात धडाका; बालरोगतज्ज्ञाच्या रुग्णालयावर एफडीएची कारवाई, औषधसाठा जप्त

SCROLL FOR NEXT