

गंगापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या अमळनेर येथील मुख्य जलवाहिनीला रामेश्वर मंदिर, कायगावकडून येणारी दुसरी जलवाहिनी जोडण्याचे काम सुरू असल्याने शहरातील पाणीपुरवठा मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाला आहे. शहरातील काही भागात २५ ते ३० दिवसांपासून पाणीपुरवठा झालेला नसल्याने नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.