कोल्हापूर

इंगळे नगरात चोऱ्या

CD

इंगळेनगरात चोरट्यांचा धुमाकूळ

एका घरात चोरी; पाच घरे फोडण्याचा प्रयत्न

कोल्हापूर, ता. २७ ः येथील एसएससी बोर्ड रिंगरोडजवळील राम मंगल कार्यालयामागे असलेल्या इंगळेनगरमध्ये बुधवारी मध्यरात्री चोरट्यांनी धुमाकूळ घातला. मुलीच्या पदवीदान समारंभासाठी कर्नाटकात गेलेल्या एका कुटुंबीयांच्या घराचे कुलूप उचकटून चोरट्याने २४ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास केला. आज (ता. २७) सकाळी याची फिर्याद सचिन दत्तात्रय मोदी यांनी राजारामपुरी पोलिस ठाण्यात दिली. दरम्यान, याच परिसरातील अन्य पाच घरेही फोडण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला आहे. या घरांतील कुटुंबीय बाहेरगावी असल्याने काही तपशील मिळू शकला नाही.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सचिन मोदी हे कुटुंबीयासह दोन दिवसांपूर्वी कर्नाटकमध्ये मुलीच्या कॉलेजमधील पदवीदान समारंभासाठी गेले होते. सकाळी परतल्यानंतर त्यांना घराचा दरवाजा उघडा दिसला. त्यांनी घरात प्रवेश करून पाहिले असता प्रापंचिक साहित्य विस्कटलेले दिसले. त्यामुळे चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. चोरट्याने बेडरुममधील कपाटातील साहित्य विस्कटलेले होते. तसेच सुमारे दीड हजार रुपयांची रोकड, तीन हजार रुपयांचे दोन चांदीचे निरंजन, सुमारे दहा हजार रुपयांच्या पत्नीच्या कानातील अंदाजे तीन ग्रॅम सोन्याचे दोन टॉप्स, तसेच दहा हजार रुपयांच्या मुलीच्या कनातील अंदाजे तीन ग्रॅम सोन्याच्या रिंगा चोरीस गेल्याचे निदर्शनास आले. त्यांनी तातडीने याची माहिती राजारामपुरी पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.
दरम्यान, याच परिसरातील डॉ. रोहित रणजित रानडे, रोहित राजेंद्र धनवडे, सचिन अशोक जाधव आणि प्रभाकर केशव वर्तक यांच्याही घरांमध्ये चोरीचा प्रयत्न झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. या घरांतील कुटुंबीय बाहेरगावी असल्याने नेमका किती रुपयाचा मुद्देमाल चोरीस गेला हे समजू शकले नाही.
-----------
साहेबांचा नाईट राऊंड
बुधवारी रात्री नेहमीप्रमाणे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याचा नाईट राऊंड होता. ते सायबर चौकात नाकाबंदी करण्यात व्यस्त असताना चोरट्यांनी इंगळेनगरमध्ये डल्ला मारला.
--------------
अन्य घरांतही चोरी
याच परिसरात आणखी काही घरांत चोरी झाल्याची महिती पुढे येत आहे. त्यापैकी एकजण पुण्याला असल्यामुळे त्यांच्याकडून अद्याप कोणतीही फिर्याद दाखल केली नसल्याचे समजते. चोरी झालेल्यांच्या घरी पोलिसांनी पंचनामा करून ठसे तज्ज्ञ, श्‍वानपथकालाही बोलविले होते. सीसीटीव्हीच्या माध्यमातून पोलिसांकडून शोध सुरू आहे.
--------
उपनगर परिसर लक्ष्य
काही दिवसांपूर्वी मंडलिकपार्कमध्येही चोरी झाली आहे. त्याचाही तपास अद्याप लागलेला नाही. तेथीही चोरट्यांनी सीसीटीव्हीचा ‘सीपीयू’सुद्धा लंपास केला आहे. यासह अन्य छोट्या-मोठ्या चोऱ्या वाढल्या आहेत. विशेष म्हणजे पोलिसांची गस्त सायबर चौक परिसरात असतानाही त्याच रिंगरोडवरील इंगळेनगरात काल चोरी झाली आहे. त्यामुळे सराईत चोरट्यांकडून उपनगर परिसर लक्ष्य केला जात असल्याचे दिसून येते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वैवाहिक संबंध नाकारणे, मुलांची जबाबदारी न घेणे मानसिक क्रूरता; दिल्ली हायकोर्टाची टिप्पणी

Mahadev Betting App: महादेव बेटींग अ‍ॅप प्रकरणी आणखी एका अभिनेत्याला अटक

IPL 2024: ईशान किशनला BCCI चा दणका, दिल्ली-मुंबई सामन्यानंतर केली मोठी कारवाई

Antarctica Penguin : ग्लोबल वॉर्मिंगमुळे नष्ट होतायत अंटार्क्टिकावरील पेंग्विन; बर्फ वितळल्यामुळे लाखो नवजात पेंग्विन्सचा मृत्यू

Iraq: इराकमध्ये समलैंगिक संबंधाना गुन्हा ठरवणारा कायदा मंजूर; तब्बल इतक्या वर्षांचा होणार तुरुंगवास

SCROLL FOR NEXT