कोल्हापूर

वरिष्ठ लिपिक कनिष्ठ

CD

महापालिका लोगो आवश्‍यक
----

पगार ‘वरिष्ठा’चा; काम ‘कनिष्ठा’चे
महापालिकेत पदोन्नती दिलेल्यांची अवस्था; प्रशासनाकडून हालचाल नसल्याने ‘जैसे थे’ स्थिती

कोल्हापूर, ता. ३० ः मार्चअखेर झाला, वसुली पूर्ण होऊन महिना झाला. पण, फेब्रुवारीत वरिष्ठ लिपिक म्हणून पदोन्नती दिलेले अनेकजण अजूनही कनिष्ठ लिपिकाचेच काम करत आहेत. पगार ‘वरिष्ठा’चा पण काम ‘कनिष्ठा’चे असा प्रकार महापालिकेत झाला आहे. प्रशासनाकडून काही हालचाली झाली नसल्याने जैसे थे स्थिती आहे.
महापालिकेतील बदल्या व पदोन्नती या विषयांबाबत सातत्याने चर्चा झाल्या. पदोन्नतीचा मुद्दा तर युनियनकडून सातत्याने ऐरणीवर ठेवला होता. प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता. त्यातून बऱ्याच वर्षापासूनची ही मागणी प्रशासनाने मान्य केली. तसेच त्याची निर्गत टप्प्याटप्प्याने करण्यास सुरूवात केली. कमी पद संख्येवरून जास्त पदसंख्येच्या कर्मचाऱ्यांची पदोन्नती करण्याचे धोरण ठरले. त्यानुसार अधिकारी पदापासून पदोन्नती दिली गेली. फेब्रुवारी महिन्यात कनिष्ठ लिपिक पदावर असलेल्यांची वरिष्ठ लिपिक पदावर नियुक्ती करण्यात आली. जवळपास ३३ जणांना ही पदोन्नती देण्यात आली. आदेश काढण्यात आले, पगारात वाढ होण्याबरोबरच पदोन्नतीचा एक टप्पा पार केल्याने त्या कर्मचाऱ्यांचा उत्साह दुणावला. पेढे वाटून आनंद साजरा करण्यात आला.
त्यांना नवीन कामाचे टेबल मिळेल अशी आशा होती. मार्चअखेर जवळ आला असल्याने व अनेकांकडे विविध विभागातील वसुलीची जबाबदारी होती. तेथील कर्मचाऱ्यांना बदलून नवीन कर्मचारी नेमले तर वसुलीवर परिणाम होण्याच्या शक्यतेने पदोन्नतीतील बहुतांशजणांना मार्चअखेरपर्यंत आहे त्या पदावरच काम करण्यास सांगितले. नवीन पदानुसार पगार देण्यात आला. मार्चअखेर होऊन महिना होत आला तरी ते अजून ‘कनिष्ठ’ लिपिकाच्या पदावरच काम करत आहेत. पगार ‘वरिष्ठां’चा घेत असले तरी ते अजून ‘कनिष्ठा’चे काम करत आहेत. जादा पगार दिला जात असल्याने प्रशासनाकडूनच त्यांना नवीन कामे देण्याची हालचाल व्हायला हवी होती.
..........
कोट
मार्च अखेरमुळे नियुक्तीची प्रक्रिया थांबवली होती. आता पदोन्नती दिलेल्यांना नवीन टेबलचे काम देण्याचे प्रस्तावित केले जात आहे. त्याबाबत प्रशासनाकडून मान्यता घेण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांची नवीन ठिकाणी नियुक्ती होईल.
-तेजश्री शिंदे, कामगार अधिकारी
.............
काहींवर ताण?
पदोन्नती ही बाब कुणालाही सुखावणारी असली तरी त्याची नवीन जबाबदारीही पेलावी लागते. त्याची तयारी करावी लागते. अनेकांना त्या जादा जबाबदारीचा ताण पेलता येत नसल्याची यापूर्वीची उदाहरणे महापालिकेत आहेत. त्याचा काहींना ताण येत असल्याची चर्चा महापालिका वर्तुळात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Telangana CM Revanth Reddy : तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना दिल्ली पोलिसांचं समन्स; अमित शाहांच्या व्हिडीओचं प्रकरण

Sairat Complete 8 Years : मराठी सिनेमाला १०० कोटींचं स्वप्न दाखवणाऱ्या 'सैराट'ला ८ वर्षं पूर्ण; रिंकूची पोस्ट चर्चेत

Share Market Closing: शेअर बाजारात तुफान तेजी; सेन्सेक्स 900 अंकांच्या उसळीसह बंद, गुंतवणूकदार मालामाल

Latest Marathi News Live Update: उदयनराजेंच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदी कराडमध्ये दाखल

Nashik News : मालेगावी भाजीपाल्याची आवक स्थिर! मे, जून महिन्यात उत्पादन घटण्याचा अंदाज

SCROLL FOR NEXT