कोल्हापूर

हजारो भाविकांनी खेळवली उत्सव मूर्ती

CD

gad36.jpg
00297
गिजवणे : महालक्ष्मी यात्रेत श्री उत्सव मूर्तीचा मिरवणूक सोहळा दिमाखात झाला. हातावर उत्सव मूर्ती खेळवताना तरुण. (आशपाक किल्लेदार : सकाळ छायाचित्रसेवा)
----------------------------------------------------------
हजारो भाविकांनी खेळवली उत्सव मूर्ती
गिजवणे महालक्ष्मी यात्रा; आठ तास मिरवणूक, मुख्य यात्रेदिवशी वाहनांच्या रांगा
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. ३ : तब्बल सोळा वर्षांनी होत असलेल्या गिजवणेच्या महालक्ष्मी यात्रेत हजारो भाविकांनी रात्रभर श्री महालक्ष्मी मूर्ती खेळवली. दिवट्यांच्या उजेडात गुलालाची उधळण आणि चांगभलंच्या गजरात श्री महालक्ष्मी मूर्तीची गावातून भव्य मिरवणूक काढली. हजारो भाविकांच्या हातांवर मूर्तीला खेळवले. सोहळा पाहण्यासाठी पंचक्रोशीतील नागरिकांसह गावातील महिलांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती.
यात्रा मंगळवारपासून (ता. २) सुरू झाली. देवीची उत्सवमूर्ती दुपारी तीन वाजता सुतार वाड्यात स्थानापन्न झाली. त्यानंतर मानकरी, हक्कदार, पंच कमिटीच्या वतीने मानाची ओटी भरली. त्यानंतर सुवासिनींकडून ओटी भरणीचा कार्यक्रम झाला. यात्रा समितीचे अध्यक्ष खातेदार बाबासाहेब पाटील, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सतीश पाटील, बी. एन. पाटील, आण्णासाहेब पाटील, माणिक पाटील आदी उपस्थित होते.
सायंकाळी सातनंतर मूर्तीला मिरवणुकीने मधल्या गल्लीतून कुंभारवाड्यात आणले. रात्री अकरा वाजता खातेदार आण्णासाहेब पाटील यांच्या वाड्यात उत्सव मूर्ती स्थानापन्न झाली. येथे मानपान, ओटी भरणी झाल्यानंतर बारा वाजता लक्ष्मी खेळवण्याच्या मुख्य सोहळ्याला सुरुवात झाली. रात्रभर दिवट्यांच्या उजेड्यात आणि गुलालाच्या उधळणीत बसवेश्‍वर मंदिर ते मुख्य मार्गावरुन लक्ष्मी मंदिरापर्यंत हा मिरवणूक सोहळा दिमाखात झाला. चांगभलंच्या गजराने परिसर दणाणून गेला होता. उत्सव मूर्ती खेळवण्यासाठी तरुणांचा सहभाग मोठा होता. मूर्ती आपल्याच ताब्यात ठेवण्यासाठी चढाओढ सुरु होती. दिवट्याही नाचवल्या जात होत्या.
----------------
मुख्य दिवशी यात्रेकरूंची मांदियाळी
गिजवणेची मुख्य यात्रा बुधवारी (ता. ३) होती. दुपारनंतर यात्रेनिमित्त स्नेहभोजन होते. यामुळे गडहिंग्लज शहरापासून गिजवणे अशा दोन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. रस्ता वाहनांच्या गर्दीत हरवल्याचे चित्र होते. ग्रामपंचायतीने पार्किंगची व्यवस्था केली होती. वाहतूक नियोजनासाठी मोजकेच पोलिस कर्मचारी होते. यामुळे सातत्याने वाहतूक कोंडी होत होती. गडहिंग्लज-आजरा या मुख्य राज्यमार्गावरच गिजवणे गाव असल्याने आजऱ्‍याकडून येणाऱ्‍या व जाणाऱ्‍या वाहनांनाही या कोंडीला सामोरे जावे लागले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Watch Video: "घरात बसून कोणाचे चांगले होणार नाही," कॅलिफोर्नियातील 83 वर्षीय आजींनी मतदानासाठी थेट गाठली बारामती

Thane News: आनंद दिघेंच आनंद आश्रमच मुख्यमंत्री शिंदेंनी हडपल, राऊतांचा थेट आरोप

Arvind Ltd. : अरविंद लिमिटेडच्या शेअर्सकडून गुंतवणुकदारांना छप्परफाड कमाई, एका वर्षात 200% वाढ...

Mumbai News: बर्गर खाल्ल्याने तरुणाचा मृत्यू, मुंबईत घडली धक्कादायक घटना, वाचा नक्की काय आहे प्रकरण

Latest Marathi News Live Update : पश्चिम रेल्वेवर दादर येथे तांत्रिक बिघाड झाल्यामुळे गाड्या 15 ते 20 मिनिट उशिराने

SCROLL FOR NEXT