कोल्हापूर

सोलापूर विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरूपदी डॉ. आर. के. कामत

CD

फोटो-00368
........

सोलापूर विद्यापीठाच्या प्रभारी
कुलगुरूपदी डॉ. आर. के. कामत

राज्यपालांकडून निवड; शुक्रवारी पदभार स्वीकारणार

कोल्हापूर, ता. ३ ः पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरूपदी डॉ. आर. के. कामत यांची निवड राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस यांनी केली आहे. या निवडीचे पत्र कुलपती कार्यालयाकडून डॉ. कामत यांना मिळाले. ते गेल्या नऊ महिन्यांपासून डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठाचे पहिले कुलगुरू म्हणून कार्यरत आहेत.
सोलापूर विद्यापीठाच्या सध्याच्या कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांचा कार्यकाल शुक्रवारी (ता. ५) पूर्ण होणार आहे. नवीन कुलगुरू निवडीची प्रक्रिया होईपर्यंत या पदाचा कार्यभार सांभाळण्यासाठी कुलपती बैस यांनी डॉ. कामत यांची निवड केली आहे. ते शुक्रवारी सोलापूर विद्यापीठाचा प्रभारी कुलगुरूपदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत. मूळचे कोल्हापूरचे असणारे कुलगुरू डॉ. कामत यांनी यापूर्वी शिवाजी विद्यापीठामध्ये विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे अधिष्ठाता, विविध अधिकार मंडळांचे सदस्य, इलेक्ट्रॉनिक्स आणि संगणक शास्त्र विभागाचे वरिष्ठ प्राध्यापक आणि विभागप्रमुख म्हणून काम केले आहे. विद्यापीठात केंद्र सरकारच्या निधीतून सायबर सुरक्षा केंद्र स्थापन करण्यात त्यांनी योगदान दिले. आयक्यूएसीचे संचालक म्हणून काम करताना विद्यापीठाला नॅकचे ए-प्लस प्लस मानांकन मिळवण्यात त्यांची प्रमुख भूमिका होती. विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने त्यांना यंग सायंटिस्ट पुरस्काराने सन्मानित केले आहे. ते ऑस्ट्रेलियातील विकटोरियन इन्स्टीट्यूट ऑफ टेक्नॉलाजीचे माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील मानद प्राध्यापक आहेत.
....

‘या निवडीबद्दल कुलपतींचे मी आभार मानतो. नवीन शैक्षणिक धोरण विद्यापीठात राबविण्याला माझे प्राधान्य राहणार आहे.
-डॉ. आर. के. कामत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naseem Khan: 'काँग्रेसने महाराष्ट्रात का नाही दिला एकही मुस्लिम उमेदवार...', नसीम खान यांचा सवाल

'माझ्यासोबत राहा अन् मुलांना जन्म दे', दहशतवाद्यानं अंगठी देत केलं प्रपोज, हमासच्या कैदेतील तरुणीची आपबीती

Latest Marathi News Live Update: PM मोदींच्या सभेच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलीस अॅक्शन मोडवर

Lok Sabha Election 2024 : मतदानाच्या दिवशी सुट्टी देणे बंधनकारक आहे का? काय सांगतो कायदा

Maharashtra Din 2024 : वर्ल्ड फेमस आहेत महाराष्ट्रातील 'हे' खास पदार्थ, एकदा चव चाखाल तर प्रेमात पडाल.!

SCROLL FOR NEXT