कोल्हापूर

जाहिरात बातमी

CD

डॉ. जगन्नाथ दीक्षित यांचे
१५ मे रोजी व्याख्यान

लोकमान्य मल्‍टिपर्पज को-ऑप सोसायटीतर्फे आयोजन
कोल्हापूर, ता. ५ ः रोजच्या धावपळीच्या जगण्यामुळे प्रत्येकाच्या जीवनशैलीत मोठे बदल झाले आहेत. या बदलांमुळे मधुमेह आणि वजनामध्ये मोठी वाढ या दोन आरोग्यविषयक तक्रारी निर्माण झाल्या आहेत. नेमक्या याच समस्यांवर मार्गदर्शन करण्यासाठी लोकमान्य मल्‍टिपर्पज को-ऑप सोसायटी लिमिटेडकडून सुप्रसिद्ध आहार तज्ज्ञ डॉ. जगन्नाथ दीक्षित यांच्या व्याख्यानाचे आयोजन केले आहे. यावेळी जीवनशैली बदलातून स्थूलत्व व मधुमेहमुक्ती या विषयावर ते मार्गदर्शन करणार आहेत. १५ मे रोजी सायंकाळी ५ वाजता केशवराव भोसले नाट्यगृह येथे व्याख्यान होईल. सदरचे व्याख्यान सर्वासाठी खुले आणि मोफत स्वरूपाचे आहे.
‘लोकमान्य’कडून नेहमीच विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. हीच परंपरा कायम ठेवत नागरिकाच्या आरोग्य संवर्धन आणि त्यासाठी योग्य मार्गदर्शन या हेतूने डॉ. दीक्षित यांच्या व्याख्यानाचे आयोजन केले आहे. मधुमेह विकार होणे आता सामान्य गोष्ट झाली आहे. अनेकजण याकडे पुरेसे लक्ष देत नाही. यातूनच पुढे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात. सोबतच वजन कमी करण्यासाठी ऐकीव गोष्टींचा अवलंब केला जातो. हे सर्व रोखण्यासाठी ''दीक्षित जीवनशैली'' अर्थात ‘दीक्षित पॅटर्न’चा अवलंब केल्यानंतर अनेकांना त्याचा लाभ झाला आहे. हीच या जीवनशैली लोकांपर्यंत पोहोचवणारे डॉ. दीक्षित स्वत: मार्गदर्शन करणार आहेत. डॉ. दीक्षित यांनी स्थापन केलेल्या असोसिएशन फॉर डायबेटिस आणि ओबेसिटी रिव्हरसल अर्थात अडोर ट्रस्टतर्फे भारतात १४ शहरांत मधुमेहमुक्ती केंद्रे सुरू असून, यातून हजारो रुग्णांना सेवा दिली जात आहे. डॉ. दीक्षित यांच्या व्याख्यानाचा लाभ कोल्हापूरकरांनी घ्यावा, असे आवाहन ‘लोकमान्य’कडून केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT Live Score: बेंगळुरूचे गोलंदाज चमकले! चिन्नास्वामी स्टेडियमवर गुजरातला 147 धावांवरच केलं ऑलआऊट

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

Weather Update : पुण्यात उन्हाचा चटका कायम राहणार; राज्यात वादळी पावसाला पोषक वातावरण

Lok Sabha Election 2024 : ४०० पार घोषणा, पण भाजप अडीचशे जागांवर अडकणार

Latest Marathi News Live Update: नारायण राणेंकडे प्रश्न सोडवण्याची हातोटी- राज ठाकरे

SCROLL FOR NEXT